जाणून घ्या आजचे राशिभविष्य कसा असेल दिवस तुमच्यासाठी
राहू काळ – सकाळी 09.00 ते 10.30
दिशा शूल – पूर्वेस असेल
आजचे नक्षत्र – धनिष्ठा 15.10 पर्यंत नंतर शततारका
चंद्र राशी – कुंभ
—————————————-
आजचे राशीभविष्य –
मेष – ( शुभ रंग- डाळिंबी)
व्यावसायिक नवे करार यशस्वी होतील. एखाद्या नव्या उपक्रमाची सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस योग्य आहे. एखाद्या रखडलेल्या मोठ्या रकमेची वसुली होऊ शकेल.
वृषभ – (शुभ रंग- राखाडी)
नोकरीच्या ठिकाणी आपल्या कामाव्यतिरिक्त फार खोलात शिरू नका. वरिष्ठांना काही सुचवण्यासाठी आजचा दिवस योग्य नाही. अडचणी आज देवालाच सांगितलेल्या बऱ्या.
मिथुन – (शुभ रंग – स्ट्रॉबेरी)
नवीनच झालेल्या ओळखीत लगेच विश्वास ठेवू नका. आज काही गोड बोली माणसे भेटतील झटपट लाभाचा मोह टाळणे हिताचे राहील. आज कामापुरतेच बोला.
कर्क – ( शुभ रंग – सोनेरी)
आज सभा संमेलनात अतिस्पष्टवक्तेपणा टाळा. इतरांना सल्ले देण्याच्या भानगडीत पडू नका. जोडीदाराचे मन जपण्याचा प्रयत्न करा. महत्वाच्या चर्चेत आपले मत मांडण्याची घाई करू नका.
सिंह- ( शुभ रंग – पांढरा )
आज फक्त कष्ट करीत रहा, फळाची अपेक्षा मात्र उद्या करा. आज काही कंटाळवाणी कामे करावी लागणार आहेत. वैवाहिक जीवनात तू तिथे मी असे वातावरण राहील.
कन्या- (शुभ रंग – गुलाबी)
चंगळवादी व विलासी वृत्ती राहील. बऱ्याच दिवसांनी काही जुन्या मित्रांच्या सहवासात रमाल. पैसा उडवायचे अनेक मार्ग सुचतील. आज संध्याकाळी डॉक्टरांची भेट संभवते.
तूळ – (शुभ रंग – मोरपिशी )
कुटुंबात आज आर्थिक सुबत्ता नांदेल. गृहिणी घर सजावटीवर खर्च करतील. भावनेच्या भरात घेतलेले निर्णय कदाचित चुकण्याची शक्यता आहे. आज प्रकृती स्वास्थ्य उत्तम राहील.
वृश्चिक – ( शुभ रंग- पिस्ता)
व्यवसायात जाहिरातबाजी वाढवावी लागेल काही तत्त्वही गुंडाळून ठेवावी लागणार आहेत. आज काहीजणांचे घर मालकांशी मतभेद होतील. शेजारी आपलेपणाने डोकावतील.
धनु – ( शुभ रंग- नारिंगी)
सामाजिक कार्यकर्ते लोकांच्या आदरास पात्र होतील. वक्त्यांची भाषणे आज प्रभावी होतील. शेजारी आज फारच गोड गोड बोलतील. आज संध्याकाळी एखाद्या घरगुती कार्यक्रमास हजेरी लावाल.
मकर – ( शुभ रंग- जांभळा)
अति धावपळ टाळा. हार्डवर्क पेक्षा स्मार्ट करण्यास प्राधान्य द्या. व्यवसायात काही उत्तम संधी चालून येणार आहे त्याचा वेळीच फायदा घ्या. निर्णय घेण्यास विलंब लावू नका.
कुंभ – ( शुभ रंग -चंदेरी)
कौटुंबिक वाढत्या गरजांमुळे जमाखर्चाचा तराजू डळमळीत होण्याची शक्यता आहे. आज कोणतीही रिस्क घेऊ नका कायद्याची चौकट मोडू नका.
मीन – ( शुभ रंग- मरून )
वास्तू किंवा वाहन खरेदीसाठी केलेले कर्ज प्रस्ताव रखडण्याची शक्यता आहे. परदेश गमन संबंधित कामे यशस्वी होतील. आज वडीलधाऱ्या मंडळींशी थोडेफार मतभेद संभवतात.
!! शुभम भवतु!!
जयंत कुलकर्णी
फोन ९६८९१६५४२४
( ज्योतिषी व वास्तू सल्लागार)