आजचे पंचांग -Today’s Horoscope 03 September 2023- जाणून घ्या आजचे राशिभविष्य
आजचे पंचांग –
वार – रविवार.
03.09.2023.
शुभाशुभ विचार- चांगला दिवस.
आज विशेष- संकष्ट चतुर्थी (चंद्रोदय 21.19)
राहू काळ – 4.30 ते 06.00.
दिशा शूल – पश्चिमेस असेल.
आजचे नक्षत्र -रेवती 10.38 पर्यंत नंतर अश्विनी.
चंद्र राशी – मीन 10.38 पर्यंत नंतर मेष.
—————————————-
मेष – ( शुभ रंग- केशरी )
कुठेही आज आपलेच खरे करण्याचा तुमचा प्रयत्न राहील. कार्यक्षेत्रात इतरांशी जमवून घेणे आज अवघड जाईल. एखादी क्षुल्लक गोष्ट फारच मनाला लावून घ्याल.
वृषभ (शुभ रंग- मरून )
आज तुम्हाला कष्टांच्या प्रमाणात मोबदला कमीच राहील. इच्छा नसतानाही काही खर्च करावे लागतील. ज्येष्ठ मंडळींचे तीर्थस्थानी प्रवास घडतील.
मिथुन ( शुभ रंग- मोरपंखी )
व्यवसायात वाढत्या स्पर्धेचा सामना करण्यासाठी सज्ज असावे लागेल. वादविवादात आपलीच मते इतरांवर लागू शकाल. आप्तसकीय आज तुमच्या शब्दाला मान देतील.
कर्क (शुभ रंग- हिरवा)
कार्यक्षेत्रात ध्येयप्राप्ती साठी अथक परिश्रमां शिवाय दुसरा पर्याय नाही. नवीन व्यावसायिकांना कष्टांचे फळ मिळेल. मित्रांनी केलेल्या खोट्या स्तुतीस भूलू नका.
सिंह (शुभ रंग- पिस्ता )
नवीन ओळखीत लगेच विश्वास टाकू नका. आज मित्रही दगा देतील. कार्यक्षेत्रातही सावधगिरीने पावले उचलणे गरजेचे आहे. अंधश्रद्धेच्या आहारी जाऊ नका.
कन्या ( शुभ रंग- पांढरा)
आज अति आक्रमकता नुकसानास कारणीभूत होईल. महत्त्वाच्या घरगुती प्रश्नात वडीलधाऱ्यांचे मत अवश्य घ्या. आज झटपट लाभाच्या अपेक्षेने नुकसानच होईल.
तूळ ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
आज तुम्ही आनंदी व उत्साही असाल. आपल्या जोडीदाराच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा तुमचा प्रयत्न राहील. कुटुंबीयांना अभिमानास्पद वाटणारी एखादी कामगिरी कराल.
वृश्चिक (शुभ रंग- राखाडी)
तुमच्या लहरी व संशयी स्वभावावर नियंत्रण ठेवायला हवे. महत्त्वाच्या चर्चेत इतरांचेही म्हणणे ऐकून घ्यायची मानसिकता ठेवणे गरजेचे आहे. आज आरोग्यास जपायला हवे.
धनु- (शुभ रंग- निळा)
प्रॉपर्टीची खरेदी विक्री तुमच्या फायद्यात राहील. मुलांची अभ्यासातील गोडी वाढेल. पालकांना मुलांच्या मागण्या पुरवाव्या लागतील. तरुणांनी कायद्याचे भान ठेवावे.
मकर ( शुभ रंग- क्रीम )
गोड बोलून आज तुम्ही तुमच्या विरोधकांनाही आपलेसे कराल. कार्यक्षेत्रात तुमच्या नेतृत्व गुणांना वाव मिळेल. आज गृहिणींचे गृह उद्योग तेजित चालतील. व्यस्त दिवस.
कुंभ (शुभ रंग – चंदेरी)
रिकाम टेकड्या चर्चेतून काहीच निष्पन्न होणार नाही. शेजाऱ्यांशी एकोपा वाढेल. काम कमी व दगदग जास्त होईल. आज एखादा पत्ता शोधण्यासाठी भटकंती करावी लागेल.
मीन -(शुभ रंग – सोनेरी )
हाती असलेल्या पैशाची उधळपट्टी करू नका. कदाचित आज एखादा असा मोठा खर्च उद्भवेल की जो टाळता येणार नाही. आज बोलताना वाणीवर लगाम ठेवावा.
श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तु सल्लागार.
संपर्क – 9689165424.