आजचे पंचांग – Today’s Horoscope 01 September 2023– जाणून घ्या आजचे राशिभविष्य
आजचे पंचांग –
वार – शुक्रवार.
01.09.2023.
शुभाशुभ विचार – उत्तम दिवस.
आज विशेष- साधारण दिवस.
राहू काळ – सकाळी 10.30 ते 12.00.
दिशा शूल – पश्चिमेस असेल.
आजचे नक्षत्र- पूर्वा भाद्रपदा 14.46 पर्यंत नंतर उत्तरा भाद्रपदा.
चंद्र राशी – कुंभ 9.36 पर्यंत नंतर मीन.
—————————————–
मेष – ( शुभ रंग- केशरी)
कार्यक्षेत्रात काही मनाविरुद्ध घटना घडण्याची शक्यता आहे. काही जणांना तातडीच्या प्रवासास निघावे लागेल. केवळ भिडस्त पणा पायी न परवडणारा खर्च करू नका.
वृषभ (शुभ रंग- मरून )
कार्यक्षेत्रात तुमच्या पूर्वीच्या कष्टांचे चीज होईल. काही अपुऱ्या स्वप्नांची पूर्तता होण्याची शक्यता आहे. जसे चिंताल तसेच होईल, त्यामुळे आज फक्त शुभ चिंता.
मिथुन ( शुभ रंग- मोरपिशी )
आज तुम्ही रिकामटेकडी चर्चा टाळून फक्त कृतीला प्राधान्य देणे गरजेचे आहे. अधिकारी वर्गास वाढत्या जबाबदाऱ्यांचे दडपण येईल. मित्र आज चुकीचे सल्ले देतील.
कर्क (शुभ रंग- हिरवा)
ज्येष्ठांना संतती कडून शुभ समाचार येतील. आज तुमचा अध्यात्माकडे कल असेल. घरात देवकार्य करण्याचे बेत आखाल. घरातील मोठ्यांचा मान राखावा लागणार आहे.
सिंह (शुभ रंग- स्ट्रॉबेरी )
आज आपल्या कुवाती बाहेर बाहेर कोणतीच रिस्क घेऊ नका. हातचे सोडून पळत्या मागे धावायचा मोह टाळा. आज सासुरवाडी कडून तुम्हाला लाभ संभवतो. पत्नीच्या हो ला हो करा.
कन्या ( शुभ रंग- पिस्ता)
व्यवसायात भागीदारांशी एकमत राहील. आज वैवाहिक जीवनातही गोडी गुलाबी असेल. आपल्या जोडीदाराचे मन जपण्याचा आज तुम्ही मनापासून प्रयत्न कराल.
तूळ ( शुभ रंग- निळा)
नोकरदारांना कामाचे तास वाढवावे लागतील. कोणतीही गोष्ट सहज साध्य नसली तरीही तुमच्या प्रामाणिक प्रयतनांना यश नक्की मिळेल. आरोग्याची काळजी घ्या.
वृश्चिक (शुभ रंग- पांढरा)
नोकरदारांना त्याच त्याच कामाचा कंटाळा येईल. आज तुमचा मौज मजा करण्याचा मूड असेल. सहकुटुंब चैन कराल. प्रेम प्रकरणांना आज थोरा मोठ्यांचे आशीर्वाद मिळतील.
धनु- (शुभ रंग- चंदेरी)
आज तुम्ही प्रत्यक्ष कृतीपेक्षा चर्चेतच जास्त रमाल. कुठेही न जाता आज घरीच आराम करण्याचा तुमचा मूड असेल. गृहिणींचे गृह उद्योग आज तेजीत चालतील.
मकर ( शुभ रंग- सोनेरी )
आज घराबाहेर वावरताना डोके थंड व वाणीत गोडवा ठेवा. काही अति हुशार मंडळी संपर्कात येणार आहेत. मोफत सल्लागार मंडळींना दुरूनच नमस्कार करा वादविवाद टाळा.
कुंभ (शुभ रंग – आकाशी)
आज व्यापार उद्योगात मिळकत मनाजोगती असेल. बंद पडलेले उपक्रम नव्याने सुरू करता येतील. आप्तस्वकीय तुमच्या शब्दास मान देतील. गोड बोलून तुम्ही इतरांची मने जिंकाल.
मीन -(शुभ रंग – राखाडी )
आज तुम्ही काहीसे लहरीपणाने वागाल. तुमच्याकडून काही आपलीच माणसे दुखावली जाण्याची शक्यता आहे. नाती जपायची असतील तर कुणीही मागितल्या शिवाय सल्ले देऊ नका.
शुभम भवतु.
श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तु सल्लागार.
संपर्क – 9689165424.