Saturday, September 23, 2023
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राशिभविष्य; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

by ग्लोबल न्युज नेटवर्क
August 19, 2023
in मनोरंजन
0
राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

आजचे पंचांग – Today’s Horoscope 19 August 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग –

वार – शनिवार.

19.08.2023.

शुभाशुभ विचार – उत्तम दिवस

आज विशेष – साधारण दिवस

 राहू काळ – सकाळी 09.00 ते 10.30.

दिशा शूल – पूर्वेस असेल.

आजचे नक्षत्र – उत्तरा फाल्गुनी 25.47 पर्यंत नंतर हस्त.

चंद्र राशी – कन्या.

—————————————-

मेष – ( शुभ रंग- पांढरा )

कला क्षेत्रातील मंडळींना वाढत्या स्पर्धेचा सामना करावा लागेल. आरोग्याच्या काही तक्रारी आज तुम्हाला त्रस्त करतील. आज संध्याकाळी डॉक्टरांच्या भेटीचा योग दिसतोय.

वृषभ (शुभ रंग- हिरवा)

कुटुंबीयांच्या वाढत्या मागण्या पुरवताना नाकी नऊ येतील. मुले आज अभ्यासात उत्कृष्ट कामगिरी करणार आहेत. गृहिणी आज पाहुण्यांची उठबस आनंदाने करतील.

मिथुन ( शुभ रंग- राखाडी)

सामाजिक कार्यकर्ते लोकांच्या आदरास पात्र होतील. आज तुम्ही  गरजूंना आवर्जून मदत कराल. इतरांची मने सांभाळाल. आज काही शुभ समाचार येणार आहेत.

कर्क (शुभ रंग- आकाशी)

आवक पुरेशी असल्याने मनासारखा खर्च करता येईल. किरकोळ कारणांवरून आज शेजारी रुसून बसतील. आज जरा स्पष्ट वक्तेपणास आवर झालेला हवा नाहीतर नाती दुरावतील.

सिंह (शुभ रंग- भगवा)

आज तुम्ही थोडेसे हट्टीपणाने वागाल. कुणाचेही ऐकून घ्यायची तुमची तयारी नसेल. उतावीळ पणाने घेतलेले काही निर्णय चुकतील. हातचे सोडून आज तुम्ही पळत्या मागे धावाल.

कन्या ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी)

एखादी हरवलेली वस्तू पुन्हा सापडेल. आज तुम्ही स्वतःच्या व्यक्तिमत्व विकासावर भर द्याल. एखादी वस्त्र खरेदी कराल. थोरा मोठ्यांच्या होला हो करा. परंतु वाद वाढवू नका.

तूळ ( शुभ रंग- निळा)

महत्त्वाच्या कामासाठी आज भटकावे लागेल. अनावश्यक खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. अधिकारी वर्गास विदेश दौरे घडतील. हातसे सोडून मृगजळा मागे धावावेसे वाटेल.

वृश्चिक (शुभ रंग- मरून)

नोकरीच्या ठिकाणी आज वरिष्ठ तुमच्या कामाची दखल घेतील. नव्या व्यावसायिकांचे कर्ज प्रस्ताव मंजूर होतील. कामाच्या व्यापात घरगुती समस्या दुर्लक्षित होतील.

धनु- (शुभ रंग- मोरपंखी)

काही मनाविरुद्ध घटनांनी नैराश्य येईल. कार्यक्षेत्रात नवे उपक्रम सुरू करण्यासाठी आज दिवस योग्य नाही. वैवाहिक जीवनात काही सौम्य मतभेद होतील.

मकर ( शुभ रंग- केशरी)

आज तुमचा आध्यात्मिक मार्गाकडे ओढा राहील. आज नास्तिकही देवाला एखादा नवस बोलतील. घरात एखादे धार्मिक कार्य करण्याचे बेत आखाल. दैवाची आज तुम्हाला साथ राहील.

कुंभ (शुभ रंग – डाळिंबी)

व्यवसायातील वाढत्या स्पर्धेने आज व्यावसायिक त्रस्त असतील. आज अडचणीच्या प्रसंगी पत्नीची खंबीर साथ असेल. कुटुंबास पुरेसा वेळ देण्याचा तुम्ही प्रयत्न कराल.

मीन -(शुभ रंग – चंदेरी)

धंद्यातील येणी वसूल होतील. गोड बोलून आज तुम्ही आपल्या विरोधकांनाही आपलेसे करू शकाल. जुनी दुखणे अंगावर काढू नका आज तुम्हाला विश्रांतीची ही आवश्यकता आहे.

शुभम भवतु.

श्री जयंत कुलकर्णी.

ज्योतिष व वास्तु सल्लागार.

संपर्क – 9689165424

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
Tags: आजचा दिवसराशिभविष्य
ADVERTISEMENT
Next Post
संरक्षण क्षेत्रातील या कंपनीच्या शेअरची कमाल, 1 लाखाचे झाले  ₹6.15 कोटी 

संरक्षण क्षेत्रातील या कंपनीच्या शेअरची कमाल, 1 लाखाचे झाले ₹6.15 कोटी 

Recent Posts

  • राज्यावर पुढचे ३-४ तास अस्मानी संकट; मुंबई, ठाण्यासह या भागांना मुसळधार पावसाचा इशारा
  • 13 लाख एलआयसी एजंट आणि एक लाख कर्मचाऱ्यांना सरकारची भेट ,अर्थ मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
  • आमच्या पप्पांनी गणपती आणला’, वडापावची गाडी चालविणारे गीतकार, चिमुकले गायक प्रसिद्धीपासून दूर…
  • राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार ,आय एम डी कडून 24 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट….
  • कळंब येथे 28 ऐवजी 29 सप्टेंबरला ईद-ए-मिलाद

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group