आजचे पंचांग – Today’s Horoscope 10 August 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य
आजचे पंचांग –
वार – गुरुवार.
10.08.2023.
शुभाशुभ विचार- 17 प. चांगला दिवस.
आज विशेष- साधारण दिवस.
राहू काळ – दुपारी 01.30 ते 03.00.
दिशा शूल – दक्षिणेस असेल.
आजचे नक्षत्र – रोहिणी
चंद्र राशी – वृषभ.
—————————————-
मेष – ( शुभ रंग- भगवा)
खिशात पैसा खेळता असल्याने तुमचा मूड छान असेल. कार्यक्षेत्रात इतरांना अशक्य असलेले तुम्ही शक्य करून दाखवाल. आज आपल्या कर्तव्यास तुम्ही प्राधान्य द्याल.
वृषभ (शुभ रंग- पांढरा )
कार्यक्षेत्रातील तुमचे महत्त्व वाढेल. वरिष्ठांनी सोपवलेल्या वाढीव जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडाल. आज महत्त्वाच्या चर्चेत मात्र इतरांचेही म्हणणे ऐकून घ्या.
मिथुन ( शुभ रंग- सोनेरी )
आज घरात वडीलधाऱ्यांची मने सांभाळावी लागणार आहेत. कोणतेही आर्थिक व्यवहार सावधपणे करायला हवेत. दूरच्या प्रवासात बेसावध राहून चालणार नाही.
कर्क (शुभ रंग- गुलाबी)
आज काही मनाजोगत्या घटना घडतील. नोकरीच्या ठिकाणी पदोन्नतीच्या मार्गातील अडथळे दूर होतील. प्रिय मित्र-मैत्रिणीच्या सहवासात आज दिवस आनंदात जाईल.
सिंह (शुभ रंग- क्रीम )
नोकरीच्या ठिकाणी सहकारी तुमच्या मताचा आदरच करतील. अधिकारांचा गैरवापर मात्र टाळा कामाच्या व्यापात आज कुटुंबीयांना वेळ देणे अवघड होईल.
कन्या ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
नवीन व्यवसायात मर्यादा ओळखून आर्थिक उलाढाली केलेल्या बऱ्या. आत्मविश्वासाचा अतिरेक नुकसानास कारणीभूत ठरेल. ज्येष्ठ मंडळींनी उपासनेत खंड पडू देऊ नये.
तूळ ( शुभ रंग- जांभळा)
कोणतेही नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी आजचा दिवस अनुकूल नाही. व्यवसायात भागीदारांशी मतभेद संभवतात. वैवाहिक जीवनात भांड्याला भांडे लागेल.
वृश्चिक (शुभ रंग- केशरी)
आज तुमचा कामातील उत्साह पाहून तुमचे विरोधकही प्रभावित होतील. वरिष्ठ तुमच्या कामाची दखल घेतील. वैवाहिक जोडीदाराशी आज चांगले सुर जुळतील.
धनु- (शुभ रंग- राखाडी)
आज तब्येत थोडी नरमच राहील. काही जुनी दुखणी डोके वर काढण्याची शक्यता आहे. येणी असतील तर अनपेक्षित पणे वसूल होतील. प्रवासात सावध असावे.
मकर ( शुभ रंग- हिरवा )
एखाद्या समारंभात तुमच्या आकर्षक व्यक्तिमत्त्वाचा चांगला प्रभाव पडेल. एकतर्फी प्रेमाला समोरून होकार मिळेल. कलेच्या क्षेत्रात नवोदितांना उत्तम संधी चालून येतील.
कुंभ (शुभ रंग – आकाशी)
शालेय उपयोगी वस्तूंचे व्यवसाय चांगले चालतील. कलाकारांना यश सोपे नाही. प्रयत्न वाढवावे लागणार आहेत. गृहिणींना आज अजिबात उसंत मिळणार नाही.
मीन -(शुभ रंग – डाळिंबी)
कार्यालयीन कामानिमित्त प्रवास घडतील. बेरोजगारांना नोकरीचे कॉल्स येतील. सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. आज आईचा शब्दाचा मान रखा. वादविवाद टाळावे.
श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तु सल्लागार.
संपर्क -9689165424