राशिभविष्य; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

आजचे पंचांग वार – बुधवार, दि. 25 ऑगस्ट 2021

शुभाशुभ विचार -16 नंतर चांगला दिवस.
आज विशेष – संकष्ट चतुर्थी. ( चंद्रोदय- 21.02)
राहू काळ – दुपारी12.00 ते 1.30.
दिशा शूल – उत्तरेस असेल.
आजचे नक्षत्र – उत्तराभाद्रपदा 20.48 पर्यंत, नंतर रेवती.
चंद्र राशी – मीन.
———————————-

आजचे राशीभविष्य

मेष – (शुभ रंग – डाळिंबी)

आज तुमच्याकडे काही फसव्या संधी चालून येतील. हातचे सोडून पळत्याच्या मागे धावू नका. कायद्याचे उल्लंघन महागात पडेल. खर्चावर ताबा आज शक्य नाही. चंगळवादी वृत्ती राहील.

वृषभ ( शुभ रंग – पांढरा)

एखाद्या नवीन व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. राशीच्या लाभातून चंद्र भ्रमण सुरू आहे तुमची काही अपुरी स्वप्ने साकार होतील. विरोधक माघार घेतील.

मिथुन ( शुभ रंग -नारिंगी)

उद्योग व्यवसायात तुमचा प्रगती रथ वेगवान राहील. आज तुम्ही आत्मविश्वासाने घेतलेले निर्णय फायदेशीर राहतील. आज तुमचा उच्च राहणीमानाकडे कल राहील.

कर्क -( शुभ रंग – लाल )

कार्यक्षेत्रात काही अंतर्गत राजकारणाचा सामना करावा लागेल. नवीनच झालेल्या ओळखीत व्यवहार करताना सतर्क राहा. आज एखादा विश्वासातला माणूसही विश्वासघात करू शकेल.

सिंह (शुभ रंग- गुलाबी)

आज तुम्ही कारण नसताना दुसऱ्याच्या भानगडीत डोकवाल. एखादा विवाह जुळवण्यासाठी यशस्वी मध्यस्थी कराल. मुलांची शैक्षणिक प्रगती तुम्हाला समाधान देईल.

कन्या – ( शुभ रंग- सोनेरी)

उद्योग-धंद्यात उद्दिष्टे साध्य करण्यासाठी कष्टाशिवाय दुसरा पर्याय नाही. जीवलग मित्रांमध्ये ही आज काही वैचारिक मतभेद होतील. आज तब्येत जरा ना नरमच राहील. जोडीदाराशी एकमत राहील.

तूळ ( शुभ रंग -क्रीम)

व्यवसायात स्पर्धकांना कमजोर समजू नका. काही येणी असतील तर मागितली तर वसूल होण्याची शक्यता आहे. संध्याकाळी डॉक्टरांच्या भेटीचा योग आहे.

वृश्चिक (शुभ रंग- पिस्ता)

उच्चशिक्षित मंडळींच्या अपेक्षा वाढतील. नवोदित कलाकारांना ग्लॅमर मिळेल. रुग्णांच्या प्रकृतीत लक्षणीय फरक दिसेल. खेळाडूंना एखाद्या नवीन खेळात रुची निर्माण होईल.

धनु (शुभ रंग- मरून)

एखाद्या सामाजिक कार्यात पुढाकार घ्याल. एखाद्या घरगुती समारंभात मनासारखा मानपान मिळाल्याने गृहणी खुश असतील. मागण्या मान्य झाल्याने बच्चे कंपनीही खुश असेल छान दिवस.

मकर ( शुभ रंग -स्ट्रॉबेरी)

एखादा पत्ता शोधण्यासाठी आज बरीच पायपीट करावी लागणार आहे. आज कुठलीही गोष्ट सहज मिळणार नाही, तरी तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना यश नक्की मिळेल.

कुंभ (शुभ रंग- मोरपंखी)

आज अथक परिश्रमांच्या जोरावर तुमची ध्येयाकडे वाटचाल सुरूच राहील.क्षुल्लक कारणावरून भावंडात मतभेद संभवतात. पण त्यावर सामंजस्याने मार्ग निघेल. प्रवासात दगदग होईल.

मीन ( शुभ रंग – जांभळा)

आज तुम्हाला आधुनिक राहणीमानाची आवड जोपासता येईल. आज संध्याकाळी एखाद्या प्रिय व्यक्ती सह मॉलमध्ये फेरफटका माराल. मनसोक्त चैन कराल.

!! शुभम भवतु!!

श्री जयंत कुलकर्णी.

फोन ९६८९१६५४२४.
( ज्योतिषी आणि वास्तू सल्लागार)

ग्लोबल न्युज नेटवर्क: