आजचे पंचांग – वार – गुरुवार, दि. 23.12.2021
शुभाशुभ विचार- 12 नंतर चांगला.
आज विशेष — साधारण दिवस.
राहू काळ – दुपारी 01.30 ते 03.00.
दिशा शूल – दक्षिणेस असेल.
आजचे नक्षत्र- आश्लेषा.
चंद्र राशी – कर्क.
_______________________
आजचे राशीभविष्य –
मेष – ( शुभ रंग- मरून )
आज तुमचा फक्त ऐश आराम करण्याकडे कल राहील. संध्याकाळी एखाद्या करमणुकीच्या कार्यक्रमांचा आस्वाद घ्याल. सहकुटुंब चैन करून बच्चे कंपनीस खुश कराल.
वृषभ – ( शुभ रंग- पिस्ता)
आज कामानिमित्त बराच वेळ घराबाहेर रहाल. गृहिणींचा शेजाऱ्यांशी सलोखा वाढणार आहे. वाहन वास्तु विषयी खरेदी-विक्री चे व्यवहार आज टाळलेले बरे.
मिथुन – ( शुभ रंग- पांढरा)
आज तुम्हाला काही प्रिय माणसांचा सहवास लाभेल. असतील शिते तर जमतील भूते याचाही अनुभव घ्याल. कुणाला मोफत सल्ला देण्याच्या भानगडीत पडू नका. गोड बोलून स्वार्थ साधून घ्या.
कर्क – ( शुभ रंग- राखाडी)
कार्यक्षेत्रात विरोधकांचा विरोध मावळेल. योग्य हितसंबंध निर्माण होतील. खर्चास आवर घालून पुरेशी बचत करता येईल. काही येणी वसूल होतील. दुरावलेली नाती जवळ येतील.
सिंह – ( शुभ रंग- भगवा)
आज तुम्ही महत्वाच्या चर्चेत अग्रेसर असाल. मित्रांनी केलेल्या खोट्या स्तुती नेही भारावून जाल. कामधंद्या निमित्त प्रवास घडणार आहेत. जमल्यास खर्चावर ताबा ठेवा.
कन्या – ( शुभ रंग- हिरवा)
आज तुम्ही आपले आवडते छंद जोपासण्यासाठी वेळ व पैसा खर्च कराल. सहकुटुंब प्रवास घडतील. भविष्यकाळाच्या दृष्टीने एखाद्या सुरक्षित गुंतवणुकीचा ही विचार कराल.
तुळ – ( शुभ रंग- पांढरा)
नव्या ओळखीतून व्यवसायवृद्धी होईल. अर्धवट बंद पडलेले उपक्रम नव्याने सुरु करता येतील. तुमच्या काही अपुर्या स्वप्नांची पूर्तता होईल. गृहलक्ष्मी व मुले प्रसन्न असतील.
वृश्चिक – ( शुभ रंग- नारिंगी)
आज तुम्हाला महत्त्वाकांक्षी व्यक्तींचा सहवास लाभेल. ध्येयपूर्ती कडे वेगाने वाटचाल होईल. आज एखाद्या जिवलग मित्रास यथाशक्ती मदत करणार आहात.
धनु – ( शुभ रंग- आकाशी)
कार्यक्षेत्रात आज काही बिकट प्रसंग यशस्वीपणे हाताळाल. विरोधकांनाही तुमचा हेवा वाटेल. तुमच्या प्रामाणिक मेहनतीला नशिबाची उत्तम साथ मिळेल. मोठे आर्थिक व्यवहार उद्या ढकला.
मकर – ( शुभ रंग- मोरपंखी)
आज काही विद्वान मंडळींचा सहवास लाभेल चांगली वैचारिक देवाणघेवाण होईल. विचार प्रगल्भ होतील. नोकरदारांनी आपण बरे आपले काम बरे या तत्वाने वागलेले बरे.
कुंभ – ( शुभ रंग – गुलाबी)
कष्टाच्या प्रमाणात मोबदला कमी असला तरी आज तुमचा कामात उत्साह दांडगा राहील. आज तुमच्यासाठी व्यस्त दिवस असून रिकामटेकड्या गप्पांसाठी अजिबात वेळ मिळणार नाही.
मीन – ( शुभ रंग- पिस्ता)
नोकरदारांना तेच तेच काम कंटाळवाणे वाटेल. काही रसिक मंडळी मनोरंजनास प्राधान्य देतील. नवोदित कलाकारांची प्रसिद्धीची हौस भागेल.
!! शुभम भवतु!!
श्री जयंत कुलकर्णी.
फोन ९६८९१६५४२४
( ज्योतिषी व वास्तू सल्लागार)