ग्लोबल न्यूज: आजचे पंचांग. वार – शुक्रवार 19 मार्च 2021
शुभाशुभ विचार — 14 नंतर चांगला दिवस.
आज विशेष — सामान्य दिवस.
राहू काळ – सकाळी 10.30ते 12.00.
दिशा शूल – पश्चिमेस असेल.
आजचे नक्षत्र – कृतिका 13.44 पर्यंत नंतर रोहिणी.
चंद्र राशी – वृषभ.
आजचे राशीभविष्य
मेष – ( शुभ रंग- आकाशी)
आज तुमचे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. गृहिणी कौटुंबिक जबाबदारी हसतमुखाने पार पाडतील. आज गरजेपुरता पैसा सहज उपलब्ध होईल. आनंदी दिवस.
वृषभ – ( शुभ रंग- पांढरा)
तुमची आर्थिक स्थिती उत्तम असल्याने तुमची मानसिक स्थिती चांगली राहील. हौशी मंडळींना जीवाची मुंबई करण्यास पुरेसा पैसा उपलब्ध होईल. उपवरांना स्थळे सांगून येतील. आज तुमचा स्वप्नपूर्तीचा दिवस आहे.
मिथुन – ( शुभ रंग -मोरपिशी )
ज्येष्ठ मंडळींनी आज प्रकृतीची काळजी घेणे गरजेचे आहे. आज देण्याघेण्याचे व्यवहार सावधपणे करावेत. आवाक्याबाहेर गेलेल्या खर्चावर लगाम अत्यंत गरजेचा आहे.
कर्क – ( शुभ रंग- पिस्ता)
व्यवसायात उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी केलेले कष्ट कारणी लागतील. व्यापार उद्योगाची मंदावलेली गती पूर्वपदावर येईल. पूर्वी केलेल्या गुंतवणूकीतून लाभ मिळेल. काही अपुरे आर्थिक व्यवहार पूर्ण होतील. संततीकडून सुवार्ता येतील.
सिंह – ( शुभ रंग – डाळिंबी )
नोकरदारांना साहेबांच्या मागेपुढे करावेच लागेल. अधिकारांचा वापर करताना भिडस्तपणा अजिबात बाळगू नका. मित्रांनी दिलेल्या आश्वासनांवर अवलंबून राहू नका.
कन्या – ( शुभ रंग- सोनेरी )
कार्यक्षेत्रात काही अनपेक्षित अडचणींचा सामना करावा लागेल. काही मनाविरुद्ध घटना मनास बेचैन करतील. सत्संनाने मानसिक बळ मिळेल. विदेश गमनाची इच्छा असणाऱ्यांना संधी चालून येतील.
तूळ – ( शुभ रंग- चंदेरी)
आज काही नकारात्मक विचार मनात येतील काही क्षुल्लक गोष्टींनी ही राग अनावर होईल. वाहन चालवत असाल तर डोके शांत ठेवा. व्यवसायात आपल्या मर्यादा ओळखूनच गुंतवणूक वाढवा.
वृश्चिक – ( शुभ रंग – सोनेरी)
महत्त्वाचे निर्णय घेताना द्विधा मनस्थिती होणार आहे. अशावेळी अनुभवी व्यक्तींचे सल्ले घ्यायला कमीपणा वाटून घेऊ नका. जोडीदार जे म्हणेल त्यास हो म्हणून मोकळे होणे वैवाहिक सुखाच्या दृष्टीने चांगले.
धनु – ( शुभ रंग- भगवा)
नोकरी-धंद्यात उत्साही वातावरण राहील. विरोधक नमते घेतील, आज तुम्हाला श्रमसाफल्याचे समाधान मिळू शकेल. काही विसरलेली येणी अनपेक्षितरीत्या वसूल होतील.
मकर – ( शुभ रंग – स्ट्रॉबेरी)
कौटुंबिक स्तरावर आज काही मनासारख्या घटना घडणार आहेत. मुलांची अभ्यासातील प्रगती कौतुकास्पद राहील. घरासाठी काही शोभिवंत वस्तूंची खरेदी कराल.
कुंभ – ( शुभ रंग- क्रीम)
शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम असून आज तुम्हाला प्रत्येक कामात चांगला उत्साह राहील. खर्चावर मात्र नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. भावनेच्या भरात कोणालाही शब्द देऊन अडकू नका.
मीन – ( शुभ रंग- मरून)
ऑफिस कामासाठी काही जवळपास चे प्रवास होतील. प्रॉपर्टीचे व्यवहार आज नकोत. गृहिणींनी आज सासुबाई कडून शाबासकीची अपेक्षा न ठेवलेलीच बरी. काही महत्वपूर्ण मेल्स येतील.
!! शुभं भवतु!!
– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार)
साभार एम पी सी न्यूज