ग्लोबल न्यूज- आजचे पंचांग वार – गुरुवार दि. 12 ऑगस्ट 2021
शुभाशुभ विचार – 15 नंतर चांगला दिवस.
आज विशेष – विनायक चतुर्थी.
राहू काळ – दुपारी 01.30 ते 03.00
दिशा शूल – दक्षिणेस असेल.
आजचे नक्षत्र – उत्तरा फाल्गुनी 08.53 पर्यंत नंतर हस्त.
चंद्र राशी – कन्या.
—————————————
आजचे राशीभविष्य
मेष – ( शुभ रंग- राखाडी)
आज तुम्हाला काही आरोग्या विषयी समस्या भेडसावतील. पोट बिघडणार आहे. खाण्या पिण्यावर नियंत्रण गरजेचे असेल. दुकानदारांची उधारी वसूल होईल. कोणतेही निर्णय उतावळेपणे घेऊ नका.
वृषभ – ( शुभ रंग- पिस्ता)
पारिवारिक सुखात वृद्धि होईल. वाहन वास्तूविषयी खरेदी-विक्री फायद्यात राहील. तरुण मंडळी आज बेफिकीरपणे वागतील. मुलांना शिस्त लावणे गरजेचे आहे.
मिथुन – ( शुभ रंग- हिरवा)
आज तुम्ही कौटुंबिक समस्यांवर लक्ष केंद्रित कराल. गृहिणींना गृहोद्योगातून चांगली मिळकत होईल. तरुणांनी कुसंगत टाळावी प्रेमप्रकरणे मनस्ताप देतील. कलाकारांना निर्मात्यांचे उंबरठे झिजवावे लागतील.
कर्क – (शुभ रंग- तांबडा)
नोकरीच्या ठिकाणी बढती बदलीच्या बातम्या येथील. विद्यार्थ्यांनी परिश्रम वाढवायला हवेत. यश वाटते तितके सोपे नाही. शेजाऱ्यांशी आपलेपणा वाढेल. प्रवास सुखकर होतील.
सिंह – ( शुभ रंग – मोरपंखी)
व्यवसायात उत्तम आर्थिक यश मिळून स्वतःचे वेगळेच स्थान निर्माण करू शकाल. आवडत्या व्यक्तीचा सहवास लाभेल. अति सडेतोड बोलून कुणाच्या भावना दुखावू नका.
कन्या – ( शुभ रंग- गुलाबी)
स्वतःचेच खरे करण्याकडे आज तुमचा कल राहील. आज घाई गर्दीत काही चुकीचे निर्णय घेणार आहात. आपल्यापेक्षा अनुभवी व्यक्तींचे ऐकून घेण्याची मानसिकता ठेवा.
तूळ – (शुभ रंग- लेमन)
आज काही दुर से नातलग संपर्कात येतील. आपल्या बोलण्याने कुणाची म्हणे दुखावली जाणार नाहीत याची काळजी घ्या. आज तुमची काही गुपिते उघड होऊ शकतात. सतर्क राहा.
वृश्चिक – (शुभ रंग- पांढरा)
आज तुमचा उंची राहणीमानाकडे कल राहील. यशस्वी व्यक्तींच्या सहवासात तुमच्याही महत्वाकांक्षा वाढतील. गृहिणी वाढत्या जबाबदाऱ्या हसतमुखाने पार पाडतील.
धनु – ( शुभ रंग- चंदेरी)
आज तुम्ही भावनेपेक्षा कर्तव्यास जास्त प्राधान्य द्याल. कार्यक्षेत्रात योग्य वेळी घेतलेल्या निर्णयांचे चीज होईल. आज काही योग्य माणसे तुमच्या संपर्कात येतील.
मकर – (शुभ रंग- आकाशी)
तुमच्या प्रामाणिक मेहनतीस नशिबाची हमखास साथ मिळेल. कार्यक्षेत्रात नवीन हितसंबंध प्रस्थापित होतील. ज्येष्ठ मंडळींना उपासनेचे फळ मिळेल.
कुंभ – ( शुभ रंग- जांभळा)
आज तुम्हाला काही अप्रिय माणसांचा सहवास सहन करावा लागेल. कुणाकडूनही सहकार्याची अपेक्षा करू नका. तरुणांनी गैरवर्तन टाळावे. वैवाहिक जीवनात जोडीदाराच्या भावना समजून घ्या.
मीन – ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
आज धंद्यातील आवक-जावक सेमच राहील गृहिणी चारचौघीत झालेल्या कौतुकाने आनंदित होतील. आज तुम्ही एखादा विवाह जुळवण्यात यशस्वी मध्यस्थी कराल.
!!शुभम भवतु!!
श्री जयंत कुलकर्णी.
फोन ९६८९१६५४२४
( ज्योतिषी व वास्तू सल्लागार)