ग्लोबल न्यूज - आजचे पंचांग. वार – गुरुवार. 27 मे 2021
शुभाशुभ विचार — अनिष्ट दिवस.
आज विशेष – साधारण दिवस.
राहू काळ – दुपारी 1.30. ते 03.00.
दिशा शूल – दक्षिणेस असेल.
आजचे नक्षत्र – ज्येष्ठा.
नक्षत्र पाया – ताम्र
चंद्र राशी – वृश्चिक.
आजचे राशीभविष्य
मेष – ( शुभ रंग- डाळिंबी)
आज तुमच्या जमा-खर्चाचा तराजू थोडासा डळमळीत होणार आहे. हौस मौज करण्यावर काही मर्यादा येतील. वैवाहिक जीवनात संध्याकाळी थोडेफार मतभेद होतील. आज वाहन जपून चालवावे.
वृषभ – ( शुभ रंग – पांढरा )
अत्यंत उत्साही व आनंदी असा दिवस सत्कारणी लावा. परिवारात सामंजस्य राहील विवाह विषयी बोलणी करायची असतील तर आज दिवस योग्य. केवळ चर्चेपेक्षा झटपट निर्णय घेणे महत्त्वाचे.
मिथुन – ( शुभ रंग -पिस्ता)
नोकरीच्या ठिकाणी स्वतःचे महत्त्व सिद्ध करायचे असेल तर वाढीव जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील. कामाच्या व्यापात आज तब्येतीकडे दुर्लक्ष होईल. विरोधक सक्रिय आहेत सतर्क राहा.
कर्क – ( शुभ रंग- सोनेरी)
आज तुम्ही कार्यक्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवू शकाल. पैशाची कमतरता अजिबात भासणार नाही. प्रिय मित्रांच्या सहवासात संध्याकाळ मजेत जाईल.
सिंह – (शुभ रंग- गुलाबी)कौटुंबिक जीवन समाधानी असेल. मागण्या पूर्ण झाल्यामुळे बच्चे कंपनी खुश असेल. गृहिणींना कुटुंबात मोठेपणा मिळेल. कलाकारांना मात्र कामे शोधावी लागणार आहेत.
कन्या – (शुभ रंग – स्ट्रॉबेरी)
आज तुमचा जास्त वेळ घराबाहेर जाईल. भावंडात सामंजस्य असेल. गृहिणींना शेजारधर्म पाळावे लागणार आहेत. प्रॉपर्टीच्या व्यवहारात कोणत्याही कागदपत्रांवर सह्या करताना सतर्क रहा.
तूळ – ( शुभ रंग – आकाशी)
आज खिशात पैसा खेळता राहील मोठेपणा घेण्यासाठी स्वतःहून काही खर्च कराल. वैवाहिक जीवनात गोडी गुलाबी राहील. आज अहंकार सोडा वाणीत थोडी मृदूता असू द्या.
वृश्चिक –( शुभ रंग- मरून)
सगळी महत्वाची कामे आज दुपार पूर्वीच करून मोकळे व्हा. सहकाऱ्यांवर विसंबून राहू नका. एखादी गहाळ झालेली वस्तू पुन्हा शोधलीत तर नक्की सापडेल.
धनु – (शुभ रंग-मोरपंखी)
काही अत्यावश्यक खर्च हात जोडून उभे असतील.आज तुम्ही एखादी सुरक्षित गुंतवणूक करण्याचाही विचार कराल. रात्रीचा प्रवास करणार असाल तर प्रवासात जागेच रहा.
मकर – (शुभ रंग- राखाडी)
आज तुम्हाला विविध मार्गाने आर्थिक लाभ होणार आहेत. नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन करू शकाल. आप्तस्वकीयात तुमच्या शब्दाला मान राहील.
कुंभ – (शुभ रंग- जांभळा)
कार्यक्षेत्रात काही नवी आव्हाने आत्मविश्वासाने स्वीकाराल. अधिकारी वर्गास अधिकार वापरावेच लागणार आहेत. कौटुंबिक समस्या वडीलधाऱ्याच्या मदतीने सुटतील.
मीन – (शुभ रंग- जांभळा)
कार्यक्षेत्रात काही नवी आव्हाने आत्मविश्वासाने स्वीकाराल. अधिकारी वर्गास अधिकार वापरावेच लागणार आहेत. कौटुंबिक समस्या वडीलधाऱ्याच्या मदतीने सुटतील.
!! शुभं भवतु!!
– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार