आजचे पंचांग – वार – सोमवार, दि. 01.11.2021
शुभाशुभ विचार- चांगला दिवस.
आज विशेष – वसुबारस. रमएकादशी
राहू काळ – सकाळी 7.30 ते 9.00.
दिशा शूल – पूर्वेस असेल.
आजचे नक्षत्र – पूर्वा फाल्गुनी 12.53 पर्यंत नंतर उत्तरा फाल्गुनी.
चंद्र राशी – सिंह 18.39 पर्यंत नंतर कन्या.
—————————————
मेष – ( शुभ रंग -मोतिया )
व्यवसायात नवीन हितसंबंध तयार होतील. स्थावराचे व्यवहार मनाप्रमाणे होतील. आज बरेच दिवसांनी तुम्हाला अपेक्षित असलेल्या प्रिय व्यक्तीचा फोन येईल.
वृषभ – ( शुभ रंग -सोनेरी )
आज तुमचे मनोबल उत्तम असेल. इतरांस अशक्य ते शक्य करून दाखवायची जिद्द बाळगाल. विरोधक तुमचा नाद सोडून देतील. आज आपल्या कर्तव्यासही प्राधान्य द्या.
मिथुन – ( शुभ रंग -केशरी )
कार्यक्षेत्रातील काही अडचणी सोडवण्यासाठी तुमच्या जुन्या ओळखी आज कामी येतील. गृहिणींना माहेरची ओढ लागेल. मुलांना अभ्यास बोअर वाटेल.
कर्क – ( शुभ रंग- हिरवा )
वाणीत गोडवा ठेवलात तर अनेक किचकट कामे सोपी होतील. आज पैशाची कमतरता भासणार नाही. एखाद्या क्षुल्लक कारणावरून शेजाऱ्यांशी थोडे खटकणार आहे.
सिंह – ( शुभ रंग- मरून )
नोकरीच्या ठिकाणी आज वरिष्ठांना गुड मॉर्निंग करणे हिताचे राहील. आज अहंकारास लगाम गरजेचा असेल. अति स्पष्टवक्तेपणा ने काही नाती दुरावतील.
कन्या – ( शुभ रंग – डाळिंबी )
आज शब्द हे शस्त्र आहे याचे भान ठेवून वागलेले बरे, अती आक्रमकता नुकसानास कारणीभूत होईल. दूरचे प्रवास करणार असाल तर सतर्क राहा. मौल्यवान वस्तू जपा.
तुळ – ( शुभ रंग – चंदेरी )
दैवाची उत्तम साथ असल्याने कार्यक्षेत्रात प्रगतीच्या मार्गातील अडथळे दूर होतील. ध्येय प्राप्ती कडे वेगाने वाटचाल कराल. आज दुपारनंतर एखादा धनलाभ संभवतो.
वृश्चिक- ( शुभ रंग- आकाशी)
आज अत्यंत उत्साही दिवस असून तुमचा कामातील उरक चांगला राहील. नोकरीत तुमच्यावर वरिष्ठांची कृपादृष्टी राहील. हाताखालच्या माणसांवर तुमचा वचक राहील.
धनु – ( शुभ रंग- जांभळा)
आज दैव तुमच्याच बाजूने आहे. कार्यक्षेत्रात श्रम कारणी लागतील घरात थोरांचे मूड मात्र सांभाळावे लागतील. भाविकांना देव दर्शनाची ओढ लागेल.
मकर – (शुभ रंग गुलाबी)
आज तुम्हाला उगीचच इतरांच्या भानगडीत डोकावण्याचा मोह होईल, पण तसे न करता फक्त आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित केलेले बरे. धाडसाची कामे टाळलेली बरी. संसारात जोडीदाराच्या मताने घ्या.
कुंभ – ( शुभ रंग – मोरपिशी)
आज कोणत्याही स्पर्धेत अंतिम विजय तुमचाच राहील. वैवाहिक जीवनात काही जुन्या स्मृती मनास आनंद देतील. प्रेम प्रकरणांना घरच्यांकडून ग्रीन सिग्नल मिळू शकतो.
मीन – ( शुभ रंग – स्ट्रॉबेरी)
कार्यक्षेत्रात आत्मविश्वासाने विपरीत परिस्थितीशी झुंज द्याल. इतरांवर विसंबून न राहता स्वावलंबनाचे धोरण हिताचे राहील. येणी वसूल झाल्याने नवीन व्यावसायिकांचा उत्साह वाढेल.
!! शुभम भवतु!!
श्री जयंत कुलकर्णी
९६८९१६५४२४.
( ज्योतिषी आणि वास्तू सल्लागार)