ग्लोबल न्यूज: आजचे पंचांग – वार – मंगळवार, दि. 19.10.2021
शुभाशुभ विचार – 19 पर्यंत चांगला दिवस.
आज विशेष – कोजागरी पौर्णिमा.
राहू काळ – दुपारी 03.00 ते 04.30.
दिशा शूल – उत्तरेस असेल.
आजचे नक्षत्र – उत्तराभाद्रपदा 12.10 पर्यंत नंतर रेवती.
चंद्र राशी – मीन.
—————————————
आजचे राशिभविष्य
मेष – (शुभ रंग- मरून)
आज रिकामटेकड्या चर्चेत व वाद विवादात तुमचा वेळ फुकट जाईल. खर्च आवाक्याबाहेर जाईल महत्त्वाची कामे दुर्लक्षित होतील. काहींचा गुढ शास्त्राकडे कल राहील.
वृषभ – (शुभ रंग – राखाडी)
चैन करण्यासाठी हाती पुरेसा पैसा असेल. उच्चशिक्षित असाल तर मनासारख्या नोकऱ्यांचे प्रस्ताव येतील. मित्रांमध्ये तुमच्या शब्दास मान राहील. छान दिवस
मिथुन- ( शुभ रंग- गुलाबी)
अविश्रांत मेहनतीच्या जोरावर ध्येयाकडे तुमची वाटचाल सुरूच राहील. नोकरदारांना वरिष्ठांच्या अपेक्षा पूर्ण करताना नाकी नऊ येतील. आज व्यस्त दिवस.
कर्क –(शुभरंग- पिस्ता)
नोकरदारांवर आज कामाचा प्रचंड ताण राहील. आज वरिष्ठांशी नमते घ्यावे लागेल व सहकाऱ्यांशी ही जुळवून घ्यावे लागेल. मीपणा सोडलात तर बरीचशी कामे सोपी होतील.
सिंह-( शुभ रंग- पांढरा)
तरुणांनी कुसंगती पासून लांब रहावे. नीतीबाह्य वर्तन अंगाशी येईल. वाहन चालवताना शिस्त पाळणे गरजेचे आहे. सासुरवाडी करून एखादा धनलाभ होऊ शकतो. पत्नी च्या हो ला हो करा.
कन्या- ( शुभ रंग- चंदेरी)
नोकरीत वरिष्ठ खुश असतील. हाताखालच्या माणसांवर वचक राहील. आज तुम्ही काही बिकट प्रसंग सहजच सोडवाल. वैवाहिक जीवनात लाडिक रुसवे-फुगवे असतीलच.
तूळ – ( शुभ रंग – सोनेरी)
काही जुन्या आरोग्याच्या तक्रारी डोके वर काढण्याची शक्यता आहे. वेळीच तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेतलेला बरा. दुकानदारांची उधारी उसनवारी वसूल होईल. हितशत्रू सक्रिय आहेत तुम्ही सतर्क राहा.
वृश्चिक – ( शुभ रंग – नारंगी)
महत्त्वाच्या कामास विलंब होईल बेरोजगारांची भ्रमंती चालूच राहील हाती असलेला पैसा जपून वापरा. आज प्रिय मित्रांच्या सहवासात संध्याकाळ मजेत जाईल.
धनु- ( शुभ रंग- आकाशी)
कार्यक्षेत्रात तुम्हाला पूर्वीच्या अथक परिश्रमाचे फळ दृष्टिक्षेपात येईल. कला-क्रीडा क्षेत्रातील मंडळींना प्रयत्न वाढवावे लागतील. गृहिणींना अजिबात उसंत मिळणार नाही.
मकर- ( शुभ रंग- निळा)
परिवारातील सदस्यांच्या गरजा वाढत राहतील. आज प्रॉपर्टी खरेदी विक्री व्यवहारात सावध राहणे गरजेचे आहे. कदाचित शेजाऱ्यांना तुमच्या मदतीची गरज लागेल.
कुंभ- ( शुभ रंग- क्रीम)
अनपेक्षितपणे काही रक्कम हाती येईल, त्याचप्रमाणे खर्चाचे ही विविध मार्ग खुणावतील. नाती जपायची असतील तर आज स्पष्टवक्तेपणा बाजूला ठेवून फक्त गोड गोड बोला.
मीन – (शुभ रंग- जांभळा)
आज आपल्याच धुंदीत व आपल्याच मस्तीत रहाल. इतरांचे विचार पटणार नाहीत. एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात आपले व्यक्तिमत्व प्रभावी राहील. जोडीदारास अभिमानास्पद वाटणारी कामगिरी कराल.
!! शुभम भवतु!!
श्री जयंत कुलकर्णी
फोन ९६८९१६५४२४
(ज्योतिषी व वास्तू सल्लागार)