ग्लोबल न्यूज - आजचे पंचांग. वार – गुरुवार. 22 एप्रिल 2021
शुभाशुभ विचार –उत्तम दिवस.
आज विशेष -साधारण दिवस.
राहू काळ – दुपारी १.३० ते ३.००.
दिशा शूल – दक्षिणेस असेल.
आजचे नक्षत्र – आश्लेषा ०८.१५ पर्यंत नंतर मघा.
चंद्र राशी – सिंह.
आजचे राशीभविष्य
मेष – (शुभ रंग – मोतिया)
नोकरीच्या ठिकाणी आज काही कंटाळवाणी कामे करावी लागतील. बेरोजगारांची भ्रमंती चालूच राहील. गृहिणी आज आपल्या आवडत्या छंदास वेळ देतील. तरुणांच्या महत्वाकांक्षा वाढतील.
वृषभ – ( शुभ रंग- सोनेरी )
आज शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित असलेले व्यवसाय चांगले चालतील. विद्यार्थ्यांची प्रगती कौतुकास्पद राहील. कलाकारांना मात्र निर्मात्यांचे उंबरठे झिजवावे लागतील.
मिथुन – ( शुभरंग – केशरी )
ऑफिस कामासाठी प्रवास होतील. घराबाहेर डोके शांत ठेवलेले बरे. वाद-विवाद संभवतात. गृहिणींनी आज सासुबाई कडून शाबासकीची अपेक्षा अजिबात ठेवू नये.
कर्क – ( शुभ रंग- हिरवा )
आज तुम्ही म्हणाल ती पूर्व असेल. आर्थिक स्थिती उत्तम असल्याने तुमची मनस्थिती ही चांगली असेल. परंतु भावनेच्या भरात कोणालाही कसलीही वचने देऊ नका.
सिंह – ( शुभ रंग – मरून )
आज तुमचा आत्मविश्वास वाढवणार्या काही घटना घडतील. एखादा जोडधंदा असेल तर त्यातून चांगली आवक होईल. देण्याघेण्याचे व्यवहार मात्र चोख ठेवावेत.
कन्या – ( शुभ रंग- डाळिंबी )
आज काही दुरचे नातलग संपर्कात येणार आहेत. इम्पोर्ट एक्सपोर्ट चे व्यवसाय तेजीत चालणार आहेत. आज काही देणी द्यावी लागतील. विवाह विषयक चर्चा आज नकोत.
तूळ – ( शुभ रंग – चंदेरी )
जुन्या गुंतवणुकीतून चांगला लाभ पदरात पडेल. काही दुरावलेली नाती जवळ येतील. संततीचे विवाहयोग जुळून येतील. मित्रच आज तुम्हाला हिताचे सल्ले देतील.
वृश्चिक – (शुभ रंग- आकाशी )
कार्यक्षेत्रातील तुमचे वर्चस्व वाढेल. नोकरीत प्रमोशन ची चाहूल लागेल. अधिकारी वर्गाच्या तुमच्या बद्दलच्या अपेक्षा वाढतील. घरगुती कामे दुर्लक्षित होतील.
धनु – (शुभ रंग- जांभळा )
हितशत्रू सक्रीय आहेत. प्रत्येक निर्णय विचारांती घ्या. आज परिश्रमाने यश सोपे होईल दैवाची साथ तर आहेच. कायदा मोडण्याचा विचारही मनात आणू नका.
मकर – ( शुभ रंग- गुलाबी )
विरोधक सक्रिय असताना बिनचूक कामास प्राधान्य द्यावे लागेल. कोणाकडून कसली अपेक्षा करू नका म्हणजे अपेक्षाभंग होणार नाही. मोठ्या आर्थिक उलाढाली आज नकोत.
कुंभ – (शुभ रंग- मोरपिशी)
घराबाहेर आज तुमच्या आकर्षक व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडेल. एखाद्या मंगल कार्यात जोडीने उपस्थित रहाल. प्रवासात मात्र खोळंबा होण्याची शक्यता आहे.
मीन – ( शुभ रंग – स्ट्रॉबेरी )
अती श्रमाचा तब्येतीवर परिणाम जाणवेल. आरोग्याच्या क्षुल्लक तक्रारीही दुर्लक्षित करू नका. खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा. पोट बिघडणार आहे.
!! शुभं भवतु!!
– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार