ग्लोबल न्यूज: आजचे पंचांग – वार – रविवार, दि. 03.10.2021
शुभाशुभ विचार — चांगला दिवस.
आज विशेष – द्वादशी श्राद्ध.
राहू काळ – सायंकाळी 04.30 ते 06.00.
दिशा शूल – पश्चिमेस असेल.
आजचे नक्षत्र – मघा.
नक्षत्र पाया– चांदी
चंद्र राशी – सिंह.
—————————————
आजचे राशीभविष्य –
मेष – (शुभ रंग – मोतिया)
नोकरीच्या ठिकाणी आज काही कंटाळवाणी कामे करावी लागतील. बेरोजगारांची भ्रमंती चालूच राहील. गृहिणी आज आपल्या आवडत्या छंदास वेळ देतील.
वृषभ -( शुभ रंग- सोनेरी )
आज शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित असलेले व्यवसाय चांगले चालतील. विद्यार्थ्यांची प्रगती कौतुकास्पद राहील. अधिकारांचा गैरवापर टाळून कर्तव्याला प्राधान्य द्या.
मिथुन- ( शुभरंग – केशरी )
ऑफिस कामासाठी प्रवास होतील. घराबाहेर डोके शांत ठेवलेले बरे. वाद-विवाद संभवतात. गृहिणींनी आज सासुबाई कडून शाबासकीची अपेक्षा अजिबात ठेवू नये.
कर्क – ( शुभ रंग- हिरवा )
आज तुम्ही म्हणाल ती पूर्व असेल. आर्थिक स्थिती उत्तम असल्याने तुमची मनस्थिती ही चांगली असेल. परंतु भावनेच्या भरात कोणालाही कसलीही वचने देऊ नका, कारण ती पाळता येणार नाहीत.
सिंह – ( शुभ रंग – मरून )
आज तुमचा आत्मविश्वास वाढवणार्या काही घटना घडतील. एखादा जोडधंदा असेल तर त्यातून चांगली आवक होईल. देण्याघेण्याचे व्यवहार मात्र चोख ठेवावेत.
कन्या -( शुभ रंग- डाळिंबी )
आज काही दुरचे नातलग संपर्कात येणार आहेत. इम्पोर्ट एक्सपोर्ट चे व्यवसाय तेजीत चालणार आहेत. आज काही देणी द्यावी लागतील. विवाह विषयक चर्चा आज नकोत.
तुळ – ( शुभ रंग – चंदेरी )
जुन्या गुंतवणुकीतून चांगला लाभ पदरात पडेल. काही दुरावलेली नाती जवळ येतील. संततीचे विवाहयोग जुळून येतील. मित्रच आज तुम्हाला हिताचे सल्ले देतील.
वृश्चिक – (शुभ रंग- आकाशी )
कार्यक्षेत्रातील तुमचे वर्चस्व वाढेल. नोकरीत प्रमोशन ची चाहूल लागेल. अधिकारी वर्गाच्या तुमच्या बद्दलच्या अपेक्षा वाढतील. घरगुती कामे दुर्लक्षित होतील.
धनु – (शुभ रंग- जांभळा )
हितशत्रू सक्रीय आहेत. प्रत्येक निर्णय विचारांती घ्या. आज परिश्रमाने यश सोपे होईल दैवाची साथ तर आहेच. कायदा मोडण्याचा विचारही मनात आणू नका.
मकर – ( शुभ रंग- गुलाबी )
विरोधक सक्रिय असताना बिनचूक कामास प्राधान्य द्यावे लागेल. कोणाकडून कसली अपेक्षा करू नका म्हणजे अपेक्षाभंग होणार नाही. मोठ्या आर्थिक उलाढाली आज नकोत.
कुंभ- (शुभ रंग- मोरपिशी)
घराबाहेर आज तुमच्या आकर्षक व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडेल. एखाद्या मंगल कार्यात जोडीने उपस्थित रहाल. प्रवासात मात्र खोळंबा होण्याची शक्यता आहे. रिकामटेकड्या चर्चा टाळा कारण त्यातून वादच वाढतील.
मीन – ( शुभ रंग – स्ट्रॉबेरी )
अती श्रमाचा तब्येतीवर परिणाम जाणवेल. आरोग्याच्या क्षुल्लक तक्रारीही दुर्लक्षित करू नका. खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा. आज कोणतेही निर्णय उताविळपणे घेणे योग्य ठरणार नाही.
!! शुभम भवतु!!
श्री. जयंत कुलकर्णी.
फोन ९६८९१६५४२४
( ज्योतिषी आणि वस्तू सल्लागार )