ग्लोबल न्यूज– आजचे पंचांग. सोमवार 09 ऑगस्ट 2021
शुभाशुभ विचार- चांगला दिवस.
आज विशेष – महादेवाचे पूजन.
राहू काळ – सकाळी 7.30 ते 9.00.
दिशा शूल – पूर्वेस असेल.
आजचे नक्षत्र – आश्लेषा 09.50 पर्यंत नंतर मघा.
नक्षत्र पाया – चांदी.
चंद्र राशी – 09.50 पर्यंत कर्क नंतर सिंह.
_______________________
आजचे राशीभविष्य
मेष – (शुभ रंग- पिस्ता)
तुमच्या कार्यक्षेत्रात तुमच्या प्रगतीचा आलेख चढता राहील. नोकरदारांना नोकरीत बदल करायचा असल्यास चांगल्या संधी चालून येतील. घर खरेदी विक्री चे व्यवहार फायदेशीर ठरतील. कलाकारांना ग्लॅमर मिळेल.
वृषभ – (शुभ रंग – मरून)
आज तुम्हाला काही कौटुंबिक कर्तव्य पार पाडण्यासाठी वेळ काढावाच लागेल. मुलांना दिलेले शब्द पाळावे लागणार आहेत. प्रेमप्रकरणे मात्र आज मनस्तापच देतील.
मिथुन – (शुभ रंग – राखाडी)
रिकामटेकडी चर्चा फक्त वादास निमंत्रण देईल आज फक्त कृतीस प्राधान्य देणे गरजेचे आहे आज तुमच्या जास्तीत जास्त वेळ घराबाहेर जाणार आहे. गृहिणींना शेजारधर्म पळवे लागणार आहेत.
कर्क – ( शुभ रंग- पांढरा)
आज तुमची आर्थिक परिस्थिती उत्तम असून मानसिक स्वास्थ्यही चांगले असेल. प्रिय पाहुण्यांचे घरी आगमन संभवते. अति स्पष्ट बोलून काही जवळची नाती दुखावू नका.
सिंह – (शुभ रंग – हिरवा )
भावनेच्या भरात दिलेले शब्द पाळावे लागणार आहेत. नेतेमंडळींची समाजात लोकप्रियता वाढेल. घरात काही हवेहवेसे वाटणारे पाहुणे येतील.
कन्या – ( शुभ रंग- भगवा)
आज काही अति आवश्यक खर्च हात जोडून उभे राहणार आहेत. दुरावलेल्या नात्यातील गैरसमज दूर होतील. पासपोर्ट विजा विषयक कामे यशस्वी होतील.
तुळ – ( शुभ रंग- नारिंगी)
नोकरीत तुमच्या कामातील निष्ठा व समर्पण वरिष्ठांना प्रभावित करेल. बढतीच्या मार्गातील अडथळे दूर होतील. व्यवसायात सहजच घेतलेले निर्णयही योग्यच ठरतील.
वृश्चिक – (शुभ रंग – केशरी)
नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ गोड बोलून राबवून घेतील. भावना व कर्तव्य यांचा समन्वय साधणे आज कठीण जाईल. जितके कमी बोलाल तितके चांगले राहील.
धनु – ( शुभ रंग – मोरपंखी)
वैवाहिक जीवनात आज संध्याकाळी क्षुल्लक मतभेद होतील. परंतु त्यातून सामंजस्याने मार्ग निघेल. आज कोणतेही मोठे आर्थिक व्यवहार सतर्कतेने करा.
मकर – ( शुभ रंग- आकाशी)
व्यावसायिक चढ उतारांचा सामना करावा लागेल, काही मनाविरुद्ध घटना आज मनास बेचैन करतील. आज थोडा संयम ठेवण्याची गरज आहे. व्यर्थ वाद टाळा.
कुंभ – ( शुभरंग- स्ट्रॉबेरी)
आज तुम्ही स्वतःचे लाड पुरवण्यासाठी खर्च कराल. तरुणांना घरातील थोरांचे विचार पटणार नाहीत. नोकरदारांना कामावर दांडी मारून घरी आराम करायचा मूड असेल.
मीन – ( शुभ रंग- गुलाबी)
आज स्वावलंबन महत्वाचे राहील. दुपारनंतर दिवस अनुकूल नाही. जवळच्या मित्रांमध्ये वितुष्ट संभवते सगळी महत्वाची कामे दुपारपूर्वी करा.
!! शुभम भवतु!!
श्री जयंत कुलकर्णी
फोन ९६८९१६५४२४
( ज्योतिषी व वास्तू सल्लागार)