साहित्यिक सुवर्णा पवार आंतरराष्ट्रीय पुरस्कारांने सन्मानित

साहित्यिक सुवर्णा पवार आंतरराष्ट्रीय पुरस्कारांने सन्मानित

मुंबई – सुप्रसिद्ध साहित्यिक व अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या राष्ट्रीय सचिव सुवर्णा पवार यांना डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कारांने माॅरिशिस मध्ये सन्मानित करण्यात आले, माॅरिशिसचे राष्ट्रपती पृथ्वीराजसिंग रूपन यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण माॅरिशिस मध्ये नुकतेच करण्यात आले.

यावेळी भारताचे केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री ,महाराष्ट्राचे माजी उर्जामंत्री नितीन राऊत उपस्थित होते, असे घडले बाबासाहेब, निर्झरा,स्त्री शिक्षण उध्दारक सावित्रीबाई फुले, लोकसखा शाहू महाराज, समेतचा दूत, हिकमत, संघर्ष मिलनाचा आदी ग्रंथाचे विपुल लेखन केले आहे.

28 व्याअखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य व अखिल 13 व्या भारतीय महात्मा फुले प्रबोधन साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्षपद भूषिवले आहे, जिल्हा महिला बालकल्याण अधिकारी म्हणून त्यांनी खूप प्रभावीपणे प्रशासकीय सेवा केली.

राज्य सरकाराच्या वतीने ही त्यांना प्रशासकीय सेवेसाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आहे.सध्या त्या सांगली येथे जिल्हा महिला बाल अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

ग्लोबल न्युज नेटवर्क: