गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याचा निर्णय मुख्यमंत्री घेतील – शरद पवार

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त आणि विद्यमान महासंचालक, होमगार्ड परमबीर सिंग यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहून थेट गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर वाझे मार्फत १०० कोटी रुपयांच्या वसुलीचे अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप लावले होते. मात्र हे आरोप आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी फेटाळले आहेत.

या संदर्भात आज शरद पवारांनी दिल्ली येथे आपल्या शासकीय निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन यावर सविस्तर भाष्य केले आहे. वाझे याला पुन्हा सेवेत रुजू करून घेण्याचा निर्णय परमबीर सिंह यांचा होता असा खळबळजनक दावा शरद पवारांनी केला आहे.

तसेच गृहमंत्री देशमुख यांचीही बाजू ऐकून घ्यावी लागेल. याबाबत सर्वांशी बोलून निर्णय घेऊ, गृहमंत्रीपदाबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील. मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन उचलबांगडी केलेल्यानंतर परमबीर सिंग हे मला भेटले होते. त्यावेळी त्यांनी अन्याय होत आहे, असे त्यांनी सांगितले होते असे सुद्धा पवारांनी बोलून दाखविले होते.

पुढे बोलताना पवार म्हणाले की, बदली केल्यानंतर परमबीर सिंग यांनी गृहमंत्र्यांवर आरोप केले आहे. जे आरोप परमबीर सिंग यांनी लगावले आहेत त्याची चौकशी करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पूर्ण अधिकार आहे. ही अत्यंत संवेदनशील आणि चुकांची मालिका असून यामुळे सरकारच्या प्रतिष्ठेवर परिणाम होतो. याची चौकशी झाली पाहिजे, असा सल्ला माझा आहे

Team Global News Marathi: