गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा – देवेंद्र फडणवीस

गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा – देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी आपल्या पत्रातून जे आरोप केले आहेत ते खूपच गंभीर आहेत. महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांवर तात्काळ राजीनामा द्यावा किंवा मुख्यमंत्र्यांनी त्यांना पदावरुन हटवावे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी लिहिलेले पत्र केवळ खळबळजनक नाही तर धक्कादायक आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात डीजी रँकच्या अधिकाऱ्याने इतक्या खुलेपणाने गृहमंत्र्यांबद्दल अशा प्रकारचं पत्र लिहिलण्याची पहिलीच वेळ आहे. या पत्रात त्यांनी एक चॅट जोडली आहे. ती व्हॉट्सअॅप आहे की एसएमएस आहे मला माहिती नाही. पण त्यांनी जे काही सांगितलं आहे तो थेट पुरावा एक प्रकारे दिसत आहे की त्यातून अशाप्रकारची पैशाची मागणी झाली आहे. त्यामुळे हे एकूणच प्रकरण गंभीर आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेले आरोप अतिशय गंभीर आहेत. त्यामुळे त्यांना मंत्रिपदावर राहण्याचा नैतिक अधिकार उरत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी त्यांचा राजीनामा घ्यावा. या संपूर्ण आरोपींची केंद्रीय तपास यंत्रणांकडून चौकशी व्हायला हवी. राज्य सरकारला केंद्रीय तपास यंत्रणांकडून होणारी चौकशी मान्य नसल्यास न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करण्यात यावी, अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे.

परमबीर सिंग डीजी म्हणून कार्यरत आहेत. डीजी म्हणून काम करत असलेल्या अधिकाऱ्यानं केलेले आरोप गांभीर्यानं घ्यायला हवेत. याशिवाय परमबीर सिंग यांनी त्यांच्या आरोपात संभाषणदेखील जोडलं आहे. त्यामुळे या सगळ्या आरोपांचं गांभीर्य वाढतं. मुख्यमंत्री ठाकरेंनी अनेकदा दोषी असल्यासकारवाई करण्याची भाषा केली आहे. त्यांनी त्यांचे शब्द खरे करून दाखवावेत, असं फडणवीस यांनी पुढे म्हटलं आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: