गृहमंत्री अनिल देशमुखांची चौकशी करणार उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश ?

मुंबई : माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे मार्फत १०० कोटी हप्ता वसुलीचा आरोप केला होता. या आरोपानंतर देशमुख यांनी सुद्धा मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य बाहेर आणण्याची विनंती केली होती. त्यात आता अनिल देशमुख यांची या प्रकरणी चौकशी करण्यात येणार आहे. अशी माहिती स्वत: अनिल देशमुख यांनी दिली.

काही दिवसांपूर्वी देशमुख यांनी ट्विट करून चौकशीची मागणी केली होती. या पत्रात देशमुख यांनी म्हटले आहे की, माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना १७ मार्च रोजी मुंबई पोलीस आयुक्त पदावरून हटवल्यानंतर त्यांनी माझ्यावर जे आरोप केले आहेत, त्या आरोपामध्ये काहीही सत्यता नसल्यामुळे त्यांनी जे आरोप लावले आहेत, या संपूर्ण प्रकरणाची त्वरीत चौकशी करून सत्य समोर आणावे अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे देशमुखांनी केली आहे.

आता देशमुखांनी केलेली मागणी मुख्यमंत्री ठाकरे यांनी मान्य केली असून या आरोपांची चौकशी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत होणार असल्याची माहिती अनिल देशमुख यांनी दिली. तसेच, जे काही सत्य आहे ते जनतेसमोर येईल, असेही ते म्हणाले.

Team Global News Marathi: