गृहमंत्री अनिल देशमुख यांना कोरोनाची लागण
*मुंबई* – महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना कोरोनाची लागण झाली आहे. देशमुख यांनी स्वतः याबाबत माहिती दिली असून आपली प्रकृती चांगली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
अनिल देशमुख यांनी ट्वीटवर अकाऊंटवर माहिती देत आपली कोरोना चाचणी सकारात्मक आली असल्याचे सांगितले.
‘आज माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून माझी प्रकृती उत्तम आहे. तरी माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करून घ्यावी, असे मी आवाहन करतो.
I have tested +ve for Covid19 today. Though I don't have much symptoms,I still request people who came in contact with me in the last few days to get themselves tested& isolate accordingly. With your prayers& blessings I'm confident I will be back serving people of my state soon.
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) February 5, 2021
लवकरच मी कोरोनावर मात करून पुन्हा आपल्या सेवेसाठी हजर होईल’, असे गृहमंत्री देशमुख यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.