होळीच्या दिवशी घरच्या घरी बनवा नैसर्गिक रंग

 

मुंबई | होळीच्या दिवशी एकमेकांना रंग आणि गुलाल उधळले नाही तर होळी साजरी केल्याची मजा येत नाही. यं रंगाच्या मस्तीत मात्र त्वचेची काळजी घेणंही तेवढंच महत्त्वाचं असतं. अनेक प्रकारचे रासायनिक रंग बाजारात उपलब्ध आहेत. रासायनिक रंगांनी होळी खेळल्यानं त्वचेवर मुरुम, अॅलर्जी किंवा जळजळ होऊ शकते. दुसरीकडे, हर्बल रंगांनी होळी खेळल्याने तुमची त्वचा चमकदार राहते. घरी हर्बल रंग कसा बनवायचा त्याबाबत जाणून घेऊया.

हिरवा रंग बनवण्यासाठी कडुलिंबाची पानं सुकवून बारीक करून त्याची पावडर किंवा पेस्ट बनवा. कडुलिंबाचा वापर त्वचेसाठी खूप फायदेशीर मानला जातो. कडुनिंबात बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि ऍलर्जीक गुणधर्म असतात ज्यामुळे मुरुम यासारख्या समस्यांपासून मुक्त होण्यास मदत होते.

केशरी रंग बनवण्यासाठी पलाशच्या फुलांचा वापर करा. यासाठी होळीच्या एक दिवस मध्यरात्री पलाशची फुले पाण्यात टाकावीत. लाल रंगासाठी बीट बारीक करून पाण्यात उकळल्यास लाल रंग तयार करता येतो. गुलाबी किंवा लाल रंगासाठी तुम्ही बीट वापरू शकता. जर तुम्हाला डार्क गुलाबी रंग हवा असेल तर बीट वाळवून बारीक करून त्याची पावडर बनवा. त्यामुळे घरच्या घरी शक्य तेवढे कलर बनवा आणि निरोगी रहा.

 

Team Global News Marathi: