शिवसेना-भाजप एकत्र आले पाहिजे; रामदास आठवले यांचे सूचक विधान

 

मुंबई | २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शविसेना पक्षाने २५ वर्ष जुन्या मित्रपक्षाला दूर सारून राष्ट्रवादी आणि काँग्रेस बरोबर महाविकास आघाडी स्थापन करत राज्यात तीन पक्षाचे सरकार आणले होते मात्र दुसरीकडे भाजपचे मित्रपक्ष असलेला रिपाई पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे युती संदर्भात अनेकदा सूचक विधान करताना आढळून आले आहेत.

अशातच आता केसीआर अध्यक्ष चंद्रशेखर राव आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भेटीवर टीका केल्यानंतर सोमवारी पुन्हा आठवलेंनी महाविकास आघाडीला टार्गेट केले आहे. महाविकास आघाडीवर टीका करताना रामदास आठवले म्हणले, हे सरकार मॅनेजमेंट चांगलं करण्यापेक्षा एकमेकांना मॅनेज करण्यात व्यस्त आहेत.

सरकारकडून विकास कामांबाबत योग्य आढावा घेतला जात नाही. सरकार पाडण्याचा आमचा मानस नाही, त्यामुळे संजय राऊत यांचे आरोप निरर्थक आहेत. तसेच केंद्रीय यंत्रणांचा वापर चुकीचा होत नाही, मोदी सरकारला अशा छोट्या चौकशी करण्याची गरज नाही. केंद्र विकास आराखडा घेऊन पुढे जात आहे.आमचे सरकार मुद्दाम कोणाला त्रास देणार नाही, असे म्हणत त्यांनी मोदी आणि भाजपची पाठराखण केली आहे. राज्यात सध्या जे जोरदार तू तू मै मै सुरू आहे, त्यावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले बोलत होते.

Team Global News Marathi: