कोरोनाने सर्वत्र हाहाकार माजवलेला आहे. त्यामुळे सर्व जग घरात एका जागेवर बसून आहे. मात्र घरात बसलेल्या प्रेक्षकांचे टीव्ही मालिका आणि करमणुकीची इतर साधने चांगलेच मनोरंजन करत आहे.
अशातच आता स्टार प्लसवरील ‘आप की नजरों ने समझा’ या मालिकेच्या शूटिंग दरम्यानचा एक व्हिडिओ चांगलाच वायरल होत आहे.
या व्हिडिओमध्ये काही लोक ‘गोल्ड डिगर गोल्ड डिगर’ असे ओरडताना दिसत आहेत. त्याचवेळी, अभिनेत्री सूटकेस घेऊन जाताना दिसत आहे. तसेच जिच्यामागे काही रागाने तापलेल्या लोकांचा समूह आहे.
यात अभिनेत्री रिचा राठोड सुटकेस घेऊन घर सोडून जायचा अभिनय करत आहे. कुटुंबातील बाकीचे सदस्य मागे उभे राहून तिला जाताना पाहत आहेत. त्याचवेळी ते जोरात ‘गोल्ड डिगर’ म्हणून ओरडत आहेत. एवढेच नाही तर, एकाने मागून बूटही फेकून मारला आहे.
दरम्यान,वास्तविक, ही व्हिडिओ क्लिप खरी नसून, ती स्क्रिप्टेड व्हिडिओ क्लिप आहे. तसेच हा व्हिडिओ व्हायरल भयानीने इंस्टाग्रामवर शेअर केला असून, तो बराच पाहिला जात आहे.