हिजाब, गधं, टिळा की शिक्षण…..

हिजाब, गधं, टिळा की शिक्षण…..
——
कर्नाटक राज्यात एका शिक्षण संस्थेत हिजाफ वरून सोशल मीडिया मध्ये खूप मोठे वादळ उठले आहे. कोण हिजाफ चे समर्थन करतेय तर कोण गधं टिळा याचे समर्थन करत आहेत. मागील दोन वर्षात जगावर कोरोनाचे संकट आले आहे. कोरोना महामारीच्या संकटात जीव वाचवण्याच्या काळजीने सर्व शैक्षणिक संस्था बंद होत्या त्यामुळे आजच्या पिढीचे शिक्षण अक्षरशः वाऱ्यावर सुटले आहे.

मागील दोन वर्षात काही मोजके दिवस सोडले तर कोणी विद्यार्थी शाळा, कॉलेज कडे फिरकले नाहीत. ऑनलाइन परीक्षेच्या नावाने केवळ आहे त्या क्लास मधून पुढे ढकलण्याचा कारभार केला गेला आहे. प्रत्यक्षात शैक्षणिक गुणवत्ता किती हा मोठा संशोधनाचा विषय आहे.

सध्या काही राज्यात निवडणूक सुरू आहेत. त्यामुळे देशातील कोणत्याही कानाकोपर्यातील छोटीशी बातमी ही देशपातळीवर मुख्य बातमी होत आहे. याचाच फायदा घेत वैचारिक मतभेद असलेले दोन टोकाचे लोक आपल्याआपल्या परीने सर्वसामान्य लोकांना धर्माचे जातीचे लेबल लावून आक्षेपार्ह वक्तव्य करून त्यांना हवे ते वातावरण निर्माण करत आहेत. त्यांचा उद्देश केवळ निवडणूक आहे हे आजच्या पालकांनी लक्षात घेणे आवश्यक आहे. काही राज्याच्या निवडणूक पूर्ण होताच हा विषय सर्व स्तरातून गुंडाळला जाईल हे निश्चित आहे.

आपला देश लोकशाही प्रधान आहे इथे आचार, विचार, धर्माचे असे सर्वच प्रकारचे स्वातंत्र्य सर्वाना आहे. आपल्या व्यवस्थेने प्रत्येकाला काही हक्क दिले आहेत त्याच बरोबर प्रत्येकाला काही कर्तव्य ही दिली आहेत त्याचा इथे विचार होणे आवश्यक आहे.

आजचा सर्वात महत्वाचा विषय आहे की हिजाफ चे समर्थन की गधं, टिळा याचे समर्थन करायचे ? कोण बरोबर ? कोण चूक ? यावर विविध मतमतांतरे येतील प्रत्येकजण आपापल्या सोयीने याचे समर्थन विरोध करेल. पण ज्या धार्मिक, राजकीय भिंती कधीही शैक्षणिक वातावरणात नव्हत्या त्या आता राजकीय फायद्यासाठी सुरवातीला जेएनयू सारख्या विद्यापीठातून आता आपल्या शाळा, कॉलेज पर्यंत पोहोचत आहेत.

या सर्व गोष्टी समोर घडत असताना पालकांनो सावध व्हा. येणार काळ प्रचंड स्पर्धेचा आहे. तुमच्या मुलांना त्यात यशस्वी होयचे असेल तर अशा गोष्टीकडे दुर्लक्ष करा. या वादात न पडता शिक्षणावर लक्ष केंद्रीत करा. आंदोलन जरूर करा पण ती आंदोलन चांगल्या, उत्तमदर्जाच्या शिक्षणासाठी करा, नौकरी, रोजगार यासाठी करा, कौशल्य आधारित शिक्षणासाठी करा.

आपल्या धर्मा नुसार प्रत्येकाला ते-ते संस्कार असावेत यात दुमत नाही पण ते संस्कार आपल्या घरात, धार्मिक, संस्कृतिक कार्यात इथपर्यंत धर्म मर्यादित असावा. धर्म कोणताही असो त्याचेही अवास्तव, निरर्थक व जिथे गरज नाही त्या ठिकणी उदात्तीकरण हे काही संधीसाधू लोकांना समजात तेढ निर्माण करण्याची संधी देते हे आज पर्यंतच्या अनेक घटनांतून दिसते.

ज्यांना चांगले शिक्षण घ्यायचे आहे त्यांना मुक्त वातावरणार शिक्षण घेऊ द्यावे. ज्यांना धर्माचे आचरण, उदात्तीकरण करायचे आहे त्यांना आजही प्रत्येक धर्माच्या काही शैक्षणिक शाखा आहेत त्यामध्ये जाऊन शिक्षण घ्यावे. पण काही मोजक्या लोकांसाठी सर्वच शैक्षणिक वातावरण खराब होणार नाही या कडे लक्ष द्यावे. आज दोन वर्षांपासून कोरोनामुळे शिक्षण क्षेत्र बंद होते. त्यामुळे आजची पिढी शिक्षणापासून किती मागे गेली आहे ते अभ्यासने गरजेचे आहे. म्हणूनच सर्वांनी या वादापासून दूर राहून आज हिजाफ, गधं, टिळा की शिक्षण हवे आहे याचा विचार करावा.
—–

ग्लोबल न्युज नेटवर्क: