“ही माघार तुमचा दिवाळी फराळ चवदार होऊ देणार नाही, अमोल मिटकरीचा भाजपाला टोला

 

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक घडामोडी घडताना दिसल्या. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाजपला ही पोटनिवडणूक न लढवण्याचे आवाहन केले होते.या आवाहनाला प्रतिसाद देत भाजपने उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला. भाजपने माघार घेतल्यामुळे ऋतुजा लटके यांचा विजय सोपा मानला जात आहे.

अशातच माघार घेण्याच्या निर्णयावरून भारतीय जनता पक्षाकडून महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून टीका केली जात आहे. ही माघार तुमचा दिवाळी फराळ चवदार होऊ देणार नाही, फटाके वाजायला अंधेरीतून सुरुवात झाली, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी लगावला आहे.

शिवसेनेने उमेदवारी मागे घेण्याच्या निर्णयानंतर भाजप आणि शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. शिवसेनेचे लाखो अग्निवीर पेटलेल्या मशालीची पहिली विजयपताका घेऊन आता आणखी त्वेषाने बाहेर पडतील. याच धगधगत्या मशालीने स्वाभिमानाचे, अस्मितेचे, अन्यायाविरुद्धचे यज्ञकुंड पेटवून त्यात महाराष्ट्र-दुष्मनांच्या, लाचार मिंध्यांच्या समिधा अर्पण करतील! पेटलेली ही मशाल आता महाराष्ट्र आणि देश उजळवून टाकेल! या शब्दांत शिवसेनेने निशाणा साधला आहे. यानंतर आता अमोल मिटकरी यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले आहे.

अमोल मिटकरी यांनी एक ट्विट केले आहे. यामध्ये, भातखळकर, बावनकुळे, शेलार, राणे , सोमय्या आणि समस्त टीम ला दिवाळी पर्वाच्या शुभेच्छा. ही माघार कदाचित तुमचा दिवाळी फराळ चवदार होऊ देणार नाही. अखेर मशाल पेटली आहे. फटाकळे वाजायला अंधेरीतुन सुरुवात झाली अभिनंदन आणि दिवाळीच्या शुभेच्छा!, असा खोचक टोला अमोल मिटकरी यांनी लगावला आहे.

Team Global News Marathi: