राज्याच्या ‘या’ भागात राहणार येत्या ५ दिवसांत पावसाचा जोर ; हवामानात मोठे बदल

पुणे : पावसासाठी पोषक वातावरण नसल्याने राज्यातील अनेक भागांत पावसाने उघडीप दिली आहे. मराठवाड्यात काही अंशी ढगाळ वातावरण असले तरी अधूनमधून ऊन पडत आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र व विदर्भात पावसाच्या हलक्या सरी बरसत आहेत. येत्या पाच ते सहा दिवस संपूर्ण कोकण, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांत पावसाचा जोर कमी राहणार असून अनेक ठिकाणी हलक्या सरी पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला.

 

सध्या बंगालच्या उपसागरात उत्तर भागात कमी दाब क्षेत्र आहे. ते बांगलादेश, पश्‍चिम बंगालच्या दिशेने सरकले आहे. त्यामुळे राज्यातील पावसाचा जोर चांगलाच कमी झाला आहे. उत्तर भारतात मॉन्सूनचा ट्रफ फिरोजपूर, हिस्सार, मिरूत, हारडोई, सुलतानपूर, नालंदा, बोकारो या भागात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे.

बांगलादेशाची किनारपट्टी आणि पश्चिम बंगाल ते बंगालचा उपसागरचा वायव्य भागात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. हे क्षेत्र समद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर आहे. तसेच दक्षिण गुजरात किनारपट्टी ते उत्तर केरळ कमी दाबाचा पट्टा आहे. त्यामुळे कोकणात जोरदार पावसासाठी पोषक वातावरण आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर या भागांत पावसाचा जोर कमीच राहणार आहे.

सध्या रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. त्यामुळे हवेत चांगलाच गारवा असून, कमाल तापमानात चांगलीच घट झाली आहे. बुधवारी (ता.२८) सकाळी आठ वाजेपर्यंत ३३ अंश सेल्सिअसची सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद झाली.

 

येथे होणार जोरदार पाऊस :
गुरुवार – ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर
शुक्रवार – ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर
शनिवार – ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर
रविवार – रायगड, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर

 

ग्लोबल न्युज नेटवर्क: