खेड्या-पाड्यात आरोग्य सेवा, शेतकरी-कामगार वर्गाचे हित जोपासणार – मुख्यमंत्री

खेड्या-पाड्यात आरोग्य सेवा, शेतकरी-कामगार वर्गाचे हित जोपासणार – मुख्यमंत्री

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सकाळी ७४ व्या भारतीय स्वतंत्र दिनानिमित्त वर्षा या आपल्या शासकीय निवासस्थानी ध्वजारोहण केले यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी रश्मी ठरे सुद्धा उपस्थित होत्या. मुख्यमंत्र्यांनी सर्व जनतेला यावेळी स्वतंत्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना खेड्यापाड्यापर्यंत आरोग्य सेवा पुरवली जाईल तसेच सरकार म्हणून शेतकरी आणि कामगारांचे हित जोपासले जाईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखविले. स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांनी मंत्रालयात आपले मनोगत व्यक्त केलं होत.

कोरोना रुग्णांना बरे करण्यासाठी अहोरात्र झटणारे डॉक्टर्स,नर्सेस, वैद्यकीय आणि पोलिस यंत्रणेत काम करणारे कर्मचारी, स्वच्छता दूत हे खरे कोविड योद्धे आहेत,आपल्यासाठी स्वातंत्र्य योद्धे आहेत. या काळातही न डगमगता ते समर्पित भावनेने सेवा देत आहेत. कोरोनातून बरे झालेले नागरिकही लढवय्ये आहेत, असं मुख्यमंत्री म्हणाले.

ग्लोबल न्युज नेटवर्क: