या पाच जिल्ह्यांनी अधिक सतर्क राहण्याचा आरोग्यमंत्र्यांनी दिला इशारा !

 

संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्या कमी होत असली तरी काही जिल्ह्यांमध्ये याचा प्रभाव कमी-अधिक प्रमाणात वाढलेला दिसून येत आहे. त्यातच तिसऱ्या लाटेचा धोका संपूर्ण देशात निर्माण झाला असून काही जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे. टोपे आज पुणे येथे दौऱ्यावर आलेले असताना त्यांनी पत्रकार माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी यावर भाष्य केले होते.

राजेश टोपे यांनी चाकणमधील एका खासगी रुग्णालयाला भेट दिली. टोपे म्हणाले की,राज्यातील कोरोना स्थिती, कोरोना प्रतिबंधक लसीकरण आणि शाळा सुरु करण्यासंदर्भात विविध मुद्यांवर त्यांनी भाष्य केलं. राज्यातील पुणे, मुंबई, रत्नागिरी, सातारा आणि अहमदनगर या जिल्ह्यांना आणखी सतर्क राहण्याची गरज असल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.

राज्यातील पुणे, मुंबई, रत्नागिरी, सातारा आणि अहमदनगर या जिल्ह्यांना आणखी सतर्क राहण्याची गरज आहे. कारण, या पाच जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत नाहीये. आजच्या तारखेला तर राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत याच जिल्ह्यांचा सत्तर टक्के वाटा आहे. त्यामुळे येथील नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असं आवाहन आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी केलंय. त्याअनुषंगाने या पाच जिल्ह्यांनी कोरोना नियमांचं तंतोतंत पालन करण्याची गरज असल्याचं टोपे यांनी नमूद केलं होत.

Team Global News Marathi: