आरोग्यमंत्री राजेश टोपे कार्यालयात हजर, मात्र कोल्हापूरचे नवे जिल्हाधिकारी वेळाने हजर |

 

कोल्हापूर | राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे हे सध्या कोल्हापूर दौऱ्यावर असून कोरोना संख्येचा आढावा घेत आहेत. शुक्रवारी जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत आहेत. ही बैठक सकाळीच सुरू झाली.

या बैठकीला आरोग्यमंत्री राजेश टोपे नेमक्या कोणकोणत्या सूचना अधिकाऱ्यांना देतात हे पाहावे लागेल. दरम्यान ही बैठक नियोजित नसल्याने अधिकाऱ्यांच्या आधीच आरोग्य मंत्री राजेश टोपे जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचले. त्यामुळे नव्याने पदभार स्वीकारलेले जिल्हाधिकारी राहुल रेखावार, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त कादंबरी बलकावडे आणि जिल्हा परिषद सीईओ संजय चव्हाण हे धावतच जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचले आहेत.
भाजपच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयात भेट

भाजप अधिकार्यांनीही टोपेंची भेट घेतली आहे. दरम्यान भाजपच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयात मंत्री टोपे यांची भेट घेऊन निवेदन दिलं. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आपण आढावा बैठक घेऊन २० दिवस झाले तरी रुग्णवाढ थांबलेली नाही. हे प्रशासनाचे अपयश आहे. त्याचबरोबर जिल्ह्यात पालकमंत्री आणि मालकमंत्री अशी अवस्था असून एकाने बैठक घेतली की दुसरा बैठक घेतो अशी टीका पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे नाव न घेता शिष्टमंडळाने टोपे यांच्यासमोर केली.

Team Global News Marathi: