आरोग्य मंत्र : हिवाळ्यात गुळ खाणे आहे खूप उपयोगी; जाणून घ्या त्याचे सर्व फायदे

आरोग्य मंत्र : हिवाळ्यात गुळ खाणे आहे खूप उपयोगी; जाणून घ्या त्याचे सर्व फायदे

पावसाळा संपून आता हिवाळा सुरू झाला आहे. वातावरणात होणाऱ्या बदलांमुळं काही आजार आपल्या मागं लागतात. म्हणूनच बदललेल्या वातावरणानुसार आपल्या खाण्यापिण्याची योग्य काळजी घेणं आवश्यक आहे. हिवाळ्याच्या हंगामात बरेच लोक त्यांच्या आहारातून काही गोष्टी वगळतात आणि काहींचा नव्यानं समावेश करतात. जर तुम्ही हिवाळ्याच्या काळात तुमच्या आहारात गुळ वापरला तर त्यामुळं तुमचं आरोग्य चांगलं राहण्यास मदत होते.

प्रथिने, व्हिटॅमिन बी 12, बी6, फोलेट, कॅल्शियम, लोह, फॉस्फरस आणि सेलेनियम यांसारखे अनेक प्रकारचे पोषक घटक गुळात आढळतात. तसेच, त्यात फॅटचे प्रमाणही नसते. या कारणास्तव, गूळ आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकतो.

शरीराला उष्णता मिळते

हिवाळ्यात थंडीचा परिणाम शरीरावर लवकर होतो. त्यामुळे विविध प्रकारच्या समस्या समोर येतात. गुळाचा प्रभाव उष्ण असतो, त्यामुळं त्याचे सेवन केल्याने शरीरात उष्णता टिकून राहते.

रक्ताभिसरण चांगले राहते

गुळाचे सेवन केल्याने रक्ताभिसरण सुधारते. यासोबतच यामध्ये असलेले सोडियम आणि पोटॅशियम देखील रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते.

थंडीपासून आराम

थंडीच्या मोसमात सर्दी-खोकल्यासारख्या समस्या उद्भवणे सामान्य आहे. गुळाचे सेवन केल्याने सर्दी-खोकल्यापासून आराम मिळतो.

चांगले पचन

गुळामुळे पचनक्रिया सुधारण्यासही खूप मदत होते. बद्धकोष्ठता, गॅस सारख्या समस्या दूर करून पोट साफ ठेवण्यासही गुळ उपयुक्त ठरतो.

अशक्तपणा टाळण्यासाठी प्रभावी

अॅनिमियापासून बचाव करण्यासाठीही गूळ उपयुक्त ठरतो. वास्तविक, गुळामध्ये भरपूर लोह आढळते. जे लाल रक्त पेशींची सामान्य पातळी राखते, ज्यामुळे शरीरात रक्त कमी होत नाही.

वजन कमी करण्यास उपयोगी

हिवाळ्यात शारीरिक हालचाली कमी होतात, ज्यामुळे वजन वाढते. गूळ पोटॅशियम इलेक्ट्रोलाइट संतुलित करतो आणि चयापचय क्रिया वाढवतो. ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

प्रतिकारशक्ती मजबूत होते

गुळात अँटिऑक्सिडंट्स, झिंक आणि सेलेनियम सारख्या पोषक घटकांचा समावेश असतो. त्यामुळं फ्री रॅडिकल्समुळे होणारे नुकसान टाळण्यास मदत करते आणि प्रतिकारशक्ती मजबूत करते. त्यामुळे गूळ आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे

सांधेदुखीवर आराम

काही वेळा हिवाळ्यातही सांधेदुखी सुरू होते. गुळातील वेदनाशामक गुणधर्मांमुळे हाडे आणि सांधेदुखी दूर करण्याचे काम करते.

(सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ग्लोबल न्यूज त्याची हमी देत नाही.)

 

ग्लोबल न्युज नेटवर्क: