कोणत्याही पदासाठी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला नाही, दिले पद तर आनंदच – एकनाथ खडसे
भाजपचे माजी जेष्ठ नेते आणि माजी महसूल मंत्री एकटं खडसे यांनी भारतीय जनता पक्षाला सोडचिट्टी देत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षात जाहीर प्रवेश केला होता. आपल्या भाषणात आपण राष्ट्रवादीकडे काहीही मागितले नसल्याचे सांगितले होते. परंतु खडसेंनी मोठ्या मनाने तेव्हा हे म्हटले असले तरी, ज्येष्ठ नेते याचा विचार करून खडसे राष्ट्रवादीत येण्याआदीपासूनच त्यांच्या पदाविषयीचा विचार राष्ट्रवादीत सुरू होता.
त्यातच आता राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या यादीत आधीपासूनच अव्वल स्थानी नाव होते. आता या चर्चेनी जोर धरला आहे. राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसे यांना राज्यपालाच्या कोट्यातून आमदारकी दिली जाणार असल्याची चर्चा सुरू आहे.
यावर बोलताना एकनाथ खडसे यांनी मी कोणत्याही पदाच्या अपेक्षेने राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला नसून मी आमदारकी किंवा खासदारकी मागितली नाही. पण ती दिली तर आनंदच आहे असं खडसे म्हणाले आहेत. पद मिळालं तरी काम करणार आहे आणि नाही मिळाले तर कार्यकर्ता म्हणून काम करणार असल्याचं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.