गुजरातला गेला फॉक्सकॉन, महाराष्ट्राला मिळाला ‘पॉपकॉर्न’ विरोधकांनी लगावला शिंदे सरकार टोला

 

हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सुद्धा विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारला पुन्हा घेरण्याचा प्रयत्न केला आहे. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्या, बिल्डर धारजीण्या मुख्यमंत्र्याचा निषेध असो अशा घोषणा देत विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर मिंधे सरकारचा तीव्र शब्दांत निषेध केला. यावेळी पुन्हा एका प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्याच्या निषेधार्थ पुन्हा एकदा शिंदे गटावर टीका करण्यात आली आहे.

आज विधिमंडळाच्या दुसरा दिवस असून महाविकास आघाडीची बैठक संपल्यानंतर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी काँग्रेस कार्यालयातून विधानभवनाच्या पायऱ्यांपर्यंत मोर्चा काढून निषेध व्यक्त केला. गांधी टोप्या घालून त्यावर बेळगाव निपाणी सहसंयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे असा उल्लेख होता.

या आंदोलनाला विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनात आदित्य ठाकरे, नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, वर्षआ गायकवाड, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवर, सुनील केदार, अभिजीत वंजारी, विकास ठाकरे, नितीन राऊत, अमोल मिटकरी, जयंत पाटील, राजेश टोपे आदि. नेते उपस्थित होते.

नहीं चलेगी नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, शिंदे-फडणवीस सरकारचा धिक्कार असो, ५० खोके एकदम ओके, या सरकारचे करायचे काय खाली डोके वर पाय.. च्या घोषणांनी विरोधकांनी विधानभवन परिसर दणाणून सोडला. आता या टीकेला सत्ताधारी विधिमंडळात काय प्रतिउत्तर देतायत हे पाहावे लागणार आहे.

Team Global News Marathi: