‘पदवीधर, शिक्षक मतदारसंघ निवडणूक आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करा’ – विभागीय आयुक्त सौरभ राव

ग्लोबल न्यूज – पुणे पदवीधर आणि पुणे शिक्षक मतदारसंघाची निवडणूक सोमवारी (दि. 2) जाहीर झाली आहे. त्याची आदर्श आचारसंहिता लागू झाली असून निवडणुकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता अंमलात आणण्यासाठी निवडणूक आयोगाच्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिल्या.

विभागीय आयुक्त कार्यालयात निवडणूक विभागाच्या सर्व अधिका-यांची बैठक विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपायुक्त प्रताप जाधव आणि निवडणूक यंत्रणेशी सबंधित अधिकारी उपस्थित होते.

आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीसाठी निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या सर्व सूचना, कोविड 19 च्या अनुषंगाने घ्यावयाची खबरदारी आदींबाबत आयुक्त राव यांनी सूचना केल्या. प्रत्येक मतदान केंद्रावर सुरक्षित अंतर ठेवण्याबाबत दक्षता घेण्यात यावी तसेच अचूक, शास्त्रोक्त व समन्वयाने वेळेत कामे पूर्ण करण्याच्या सूचनाही विभागीय आयुक्त राव यांनी दिल्या. बैठकीत जाधव यांनी निवडणुकीच्या तयारीची माहिती दिली.

ग्लोबल न्युज नेटवर्क: