राज्यपाल कोश्यारी यांना पदावरून हटवण्यात यावे, डाव्या पक्षांची मागणी

राज्यपाल कोश्यारी यांना पदावरून हटवण्यात यावे, डाव्या पक्षांची मागणी

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे देशातही लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. सरकारने काही दिवसांनी नियमांमध्ये शिथिलता देत हळू हळू अनेक गोष्टी चालू केल्या. मात्र, मंदिरं, मस्जिद गुरुद्वारे यांसारखी प्रार्थना स्थळे अद्याप उघडण्यात आली नाहीत. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या कृतीमुळे त्यांना राज्यपालाच्या पदावरून हटवण्यात यावे, अशी मागणी डाव्या पक्षांकडून करण्यात येत आहे. राज्यपालांना पदावरून हटविण्याबाबत डाव्या पक्षांकडून राष्ट्रपतींना निवेदनंही देण्यात आली आहेत.

कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना तुम्ही धर्मनिरपेक्ष झालात का?, असा सवाल विचारून राज्यघटनेचा अवमान केला आहे. भारत धर्मनिरपेक्षतेविषयी वचनबद्ध राहणार असल्याची ग्वाही राज्यघटनेतून देण्यात आली आहे. कोश्यारी यांनी विचारलेल्या सवालामुळे त्यांनी राज्यपाल पद स्वीकारताना घेतलेल्या शपथेचा भंग झाला आहे, असं डाव्या पक्षांनी निवेदनात म्हटलं आहे. तसेच भाकपनेही राज्यपालांना हटविण्याबाबत निवेदन दिलं आहे. कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना केलेलं पत्र पाहता त्यांनी राज्यघटनेचा अपमान केला आहे. यामुळे राष्ट्रपतींनी त्यांना पदावरून हटवावे, अशी मागणी भाकपने केली आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: