सराफ गुगळे यांच्यावर पोलीस दल,गृहमंत्र्यांची बदनामी केली म्हणून सरकारी गुन्हा दाखल

संतोष गिरीगोसावी यांनी 5 लाख रुपये मागितले नसल्याचे चौकशीत झाले सिद्ध

सावकार सराफ अमृतलाल गुगळे यांच्यावर महाराष्ट्र पोलीस दल,गृहमंत्र्यांची बदनामी केली म्हणून सरकारी गुन्हा दाखल

बार्शी: लॉकडाऊन काळात दुकाने बंद ठेवण्याचे आदेश असताना बार्शीतील सराफ व्यवसायिक अमृतलाल गुगळे यांचेवर गुन्हा दाखल करून त्यांचे दुकान आपत्ती व्यवस्थापन कायदा अंतर्गत सील करण्यात आले होते. त्यानंतर गुगळे यांनी व्हिडीओ क्लिप व्हायरल करून पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी 5 लक्ष रुपयांची मागणी करणारी क्लिप समाज माध्यमात व्हायरल केली होती. या प्रकरणाची सखोल चौकशी केली असता,पत्रकार मित्रांकरवी पैश्याची मागणी केली नसल्याचे निष्पन्न झाले.आपल्यावरील कारवाई टाळली जावी यासाठी व पुर्वग्रहदुषीत पणे पोलीसांची बदनामी होइल अश्या व्हिडीओ क्लिप समाज माध्यमात प्रसारीत करून महाराष्ट्र पोलीस दलाची, गृहमंत्री व गृह विभाग यांची जाणीव पुर्वक बदनामी केली म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजित धाराशिवकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुगळे यांच्या विरोधात बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यायाबत अधिक माहिती अशी की,मी अभिजीत तानाजी धाराशिवकर ने उपविभागीय पोलीस अधिकारी बार्शी विभाग बार्शी जि. सोलापुर (ग्रामीण) जबाब देतो की. मो.न.7387546840 मी उपविभागीय पोलीस अधिकारी बाशी विभाग बाशी येथे उपविभागीय पोलीस अधिकारी या पदावरती दि.04/10/2020 पासुन नेमणुकीस आहे.

सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये कोरोना या विषाणुचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून वेगवेगळया उपाययोजना केल्या जात आहेत त्या अनुषंगाने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदयाची अंमलबजावणी चालु आहे. जिल्हाधिकारी सोलापुर यांनी त्यांचे कडील आदेश क्र.2021/डी.सी.बी./02/आर.आर./1744 दि.14/04/2021 अन्वये सोलापुर जिल्हयातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंद ठेवण्या बाबत आदेश जाहीर करण्यात आल्याने त्याची महसुल विभाग, नगरपालीका तसेच पोलीस विभागाकडुन बार्शी शहरात अंमलबजावणी चालु आहे.

दि.17/04/2021 रोजी चांदमल ज्वेलर्स हे दुकान गस्तीवरील पोलीसांना मा. जिल्हाधिकारी यांचे वरील आदेशाचे उल्लंघन करून चालु असलेले मिळुन आल्याने त्या दुकानामध्ये उपस्थीत असणारे दुकानाचे चालक अमृतलाल चादमल गुगळे यांचेवर पो.शि.1269 उत्रेश्वर वसिष्ठ घुले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बार्शी शहर पोलीस ठाणेस गु.र.नं.186/2021 भा.द.वी.क.188,269,270,सह आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम 51(ब) सह साथीचे रोग अधिनियम कलम 2,3,4 सह कोवीड 19 विनियम 2020 चे कलम 11 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला व सदरचे दुकान हे 30 दिवसासाठी सिल करण्यात आले.

दि.18/04/2021 रोजी उपरोक्त गुन्हयातील आरोपी अमृतलाल गुगळे यांनी स्वताची एक व्हिडीओ क्लिप प्रसार माध्यमा वरती प्रसारीत केली ज्या मध्ये त्यांनी पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी अमृतलाल गुगळे यांच्या पत्रकार मित्रांकडे त्यांच्यावरील कारवाई टाळण्यासाठी पाच लाख रूपयांची मागणी केली असता गुगळे यांनी त्यास नकार दिल्यानंतर पो.नि. गिरीगोसावी हे गुगळे यांना म्हणाले की ‘आम्हाला गृहमंत्र्यापर्यंत हप्ते पोहचवावे लागतात. वगैरे अशी तयार केलेली व्हिडीओ क्लिप त्यांनी सामाजीक प्रसार माध्यमाद्वारे प्रसारीत केली.

राज्याचे गृहमंत्री यांचे नाव घेवुन पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांच्या विरूध्द गंभिर स्वरूपाचे आरोप अमृतलाल
गुगळे यांनी प्रसारमाध्यमा द्वारे केलेले असल्याने पोलीस अधिक्षक यांच्या आदेशान्वये सदरच्या प्रकरणाची चौकशी
आम्ही करण्याबाबत आदेश मिळाल्याने सदर प्रकरणाची आम्ही चौकशी केली.या मध्ये पोलीस निरीक्षक, तसेच संबधित कारवाईतील सहभागी असणारे पोलीस अंमलदार,तसेच यांना अमृतलाल गुगळे यांच्यासाठी भेटलेले पत्रकार नामे विजय निलाखे,योगेश लोखंडे तसेच त्यांच्यासोबत असणा-या राजकीय व्यक्ती राजेंद्र गायकवाड यांचे जबाब नोंदविले असता पोलीस निरीक्षक गिरीगोसावी यांनी सदरच्या प्रकरणाबाबत कोणत्याही प्रकारे पैशाची मागणी केली नसल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे.

एकंदरीत सदरच्या प्रकरणाच्या चौकशी मध्ये पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी अमृतलाल गुगळे यांच्या कडे किंवा त्यांच्या पत्रकार मित्रांकरवी पैश्याची मागणी केली नसल्याचे निष्पन्न झाले.आपल्यावरील कारवाई टाळली जावी
यासाठी व पुर्वग्रहदुषीत पणे पोलीसांची बदनामी होइल अश्या व्हिडीओ क्लिप समाज माध्यमात प्रसारीत करून महाराष्ट्र
पोलीस दलाची, गृहमंत्री व गृह विभाग यांची जाणीव पुर्वक बदनामी केली म्हणुन माझी अमृतलाल चांदमल गुगळे यांचे
विरूध्द भा.द.वी. क.500,505(1)(ब) प्रमाणे सरकारतर्फे फिर्याद आहे असे म्हटलं आहे.

संगणकावर टंकलिखीत केलेला माझा वरील जबाब मी वाचुन पाहीला तो माझे सांगणे प्रमाणे बरोबर आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: