टीका करणाऱ्यांना रोखण्याऐवजी कोरोनाला रोखायला हवं होतं – लॅन्सेट

संपूर्ण देशात आज कोरोना परिस्थिती अतिशय भयानक बनत चालली आहे. त्यात रुग्णसंख्या सुद्धा झपाट्याने वाढताना दिसत आहे. आज कोरोनामुळे बिघडत चाललेल्या देशाच्या परिस्थितीवर जगभरातील प्रसिद्ध वृत्तपत्रांनी मोदी सरकारवर ताशोरे ओढले होते. त्यात जगप्रसिद्ध वैद्यकीय संशोधन मासिक ‘लॅन्सेट’ने आपल्या संपादकीयमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.

 

 

 

 

 

 

 

‘लॅन्सेट’ने ट्वीटरवर टीका करणाऱ्यांना रोखण्यापेक्षा मोदी सरकारने कोव्हिडला रोखण्यासाठी उपाय-योजनांवर भर द्यायला हवा होता. स्वत:वरची टीका आणि खुल्या चर्चेला रोखण्याचा प्रयत्न यामुळे ते माफीला पात्र नाहीत, असं परखड मत ‘लॅन्सेट’मध्ये नोंदवण्यात आलं आहे. इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ मॅट्रिक्स अँड इव्हॅल्युएशन संस्थेच्या मते, भारतात 1 ऑगस्टपर्यंत कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या एक लाखापर्यंत पोहोचू शकते.

 

सुरुवातीच्या टप्प्यात कोरोनावर नियंत्रण मिळवल्यानंतर सरकारच्या टास्क फोर्सची बैठकच झालेली नाही. याचे परिणाम आपल्या समोर आहेत. कोरोनाचं संकट वाढतच चाललं आहे आणि भारताला यासंदर्भात नव्याने पावलं उचलण्याची आवश्यकता आहे. सरकार आपल्या चुका मान्य करणार का यावर नव्या धोरणांचं यश अवलंबून असेल. देशाला पारदर्शी नेतृत्व देणार का हाही मुद्दा आहे, असं ‘लॅन्सेट’मध्ये म्हटलं आहे. लॅन्सेटने म्हटल्याप्रमाणे, वैज्ञानिक आधारावर सार्वजनिक आरोग्याशी निगडीत उपाययोजना करायला लागतील. जोपर्यंत लसीकरण वेगाने सुरू होत नाही तोवर कोरोनाला रोखण्यासाठी सर्वतोपरी पावलं उचलायला हवीत असे मत मांडले आहे.

आज कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे, सरकारने यासंदर्भात डेटा उपलब्ध करून द्यायला हवा. दर पंधरा दिवसांनी नेमकं काय घडतं आहे याची माहिती नागरिकांना द्यायला हवी. कोरोनाला थोपवण्यासाठी काय उपाय अमलात आणले गेले आहेत याची माहितीही नागरिकांना द्यावी. देशव्यापी लॉकडाऊनसंदर्भात चर्चा व्हायला हवी, असं या लेखात लिहिलं आहे. लसीकरणाला गती देणं आवश्यक आहे असं स्पष्ट केलं आहे.

 

Team Global News Marathi: