गूगल पे’ची सेवा आता मोफत वापरता येणार नाही
जर तुम्ही पैशाचा व्यवहार गूगल पे अँपने करत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी. कारण यापुढे गूगल पे पैसे ट्रान्सफर मोफत करणार नाहीय. यापुढे बँक टू बँक पैसे ट्रान्सफर करण्यासाठी पैसे आकारले जाणार आहे. यासाठी कंपनीने तयारी सुरु केली आहे टेक साईड बिझनेस इनसाइडर यांनी यासंदर्भात माहिती दिली.
जानेवारी २०२१ पासून पीयर टू पीयर पेमेंट सुविधा गुगल पे’तर्फे बंद केली जाणार आहे. यासोबतच कंपनीतर्फे इस्टेट मनी ट्रान्सफर पेमेंट सिस्टिम जोडली जाणार आहे. यानंतर युजर्सला मनी ट्रान्सफर करण्यासाठी चार्जेस द्यावे लागणार आहे. यासाठी किती चार्ज घेतला जाणार ? हे अद्याप कंपनीने स्पष्ट केले नाही.
गुगल पे युजर्स मोबाईल एप किंवा वेब एपच्या माध्यमातून आपली सुविधा देतात. कंपनीने आपले वेब एप बंद करण्याची घोषणा केली आहे. आता पैसे ट्रान्सफर करण्यासाठी pay.google.com चा वापर करता येणार नाही.
मनी ट्रान्सफर करण्यासाठी आता केवळ Google Pay एपचा वापर होऊ शकणार आहे. गुगल पेचे सपोर्ट पेज जानेवारीपासून बंद केले जाणार आहे. बॅंक अकाऊंटमधून पैसे पाठवताना एक ते तीन दिवस लागतात. तर डेबिट कार्डने ते तात्काळ ट्रान्सफर होतात.