खूशखबर! भारतात ७३ दिवसांत येणार करोनाची लस, केंद्र सरकार करणार मोफत लसीकरण

खूशखबर! भारतात ७३ दिवसांत येणार करोनाची लस, केंद्र सरकार करणार मोफत लसीकरण

ग्लोबल न्यूज: करोनाच्या संकटात भारतीयांसाठी एक खूशखबर आहे. कारण भारतीयांची करोना विषाणूवरील लसीची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. येत्या ७३ दिवसांमध्ये ‘कोविशिल्ड’ नावाची कोविड-१९ आजारावरील भारताची पहिली विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. या लसीवर काम करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटने याबाबत माहिती दिली आहे. विशेष म्हणजे केंद्र सरकार याचे मोफत लसीकरण करणार आहे.

या लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सिरम इन्स्टिट्यूटकडून सुरु आहे. ही लस ऑक्सफर्ड विद्यापीठाने तयार केली असून त्याची भारतातच निर्मिती केली जाणार आहे. बिझनेस टुडेने सिरम इन्स्टिट्यूटच्या हवाल्याने याबाबत वृत्त दिले आहे.

तिसर्‍या टप्प्याच्या चाचणीचा पहिला डोस शनिवारी दिला

‘भारत सरकारने आम्हाला विशेष निर्माण प्राधान्य परवाना दिला आहे. या अंतर्गत, आम्ही चाचणी प्रोटोकॉलची प्रक्रिया वेगवान केली आहे जेणेकरुन चाचणी ५८ दिवसांत पूर्ण होईल. अशा प्रकारे, तिसर्‍या टप्प्याच्या चाचणीचा पहिला डोस देण्यास शनिवारपासून सुरुवात झाली आहे. दुसरा डोस २९ दिवसांनी दिला जाईल. चाचणीचा अंतिम डेटा दुसरा डोस दिल्यानंतर १५ दिवसांनंतर येईल. यानंतर आम्ही कोविशिल्ड व्यावसायिक वापरासाठी बाजारात आणण्याचा विचार करत आहोत’, अशी माहिती पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या अधिका-यांनी दिलीय. ‘बिझिनेस टुडे’ने वृत्त दिलंय.

या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला भारतातील २० केंद्रांवर शनिवारपासून सुरुवात झाली. यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रात पुणे आणि मुंबईत तर गुजरातमधील अहमदाबाद येथे याची चाचणी होत आहे. या टप्प्यात १,६०० लोकांवर याची चाचणी होणार आहे.

बिझनेस टुडेच्या वृत्तानुसार, ही लस सिरम इन्स्टिट्यूटच्या मालकीची असून कंपनीने ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या अॅस्ट्रा झेनिका लॅबशी याबाबत सर्वात आधी करार केला आहे. या करारांतर्गत भारतासाठी या लसीचे हक्क आणि रॉयल्टी विकत घेण्यात येणार आहे. भारतासह जगातील ९२ देशांमध्ये या लसीची विक्री केली जाणार आहे.

73 दिवसांत देशात कोरोनावर लस उपलब्ध होईल असं वृत्त बिझनेस टुडेनं प्रसिद्ध केलं होतं. त्या वृत्तावर सीरमनं आता स्पष्टीकरण दिलंय.

कोविशिल्ड’च्या उपलब्धतेविषयी माध्यमांमध्ये सध्या जे दावे केले जात आहेत, ते पुर्णपणे खोटे व अंदाजावर आधारित आहेत. अद्याप सिरमच्या लशीच्या तिसऱ्या टप्प्याच्या ट्रायल्स सुरू आहे. त्याचे सकारात्मक परिणाम समोर आल्यानंतरच लशीच्या उपलब्धतेबद्दल अधिकृत घोषणा केली जाणार आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: