नवी दिल्ली : सोने आणि चांदीत सोमवारी स्थानिक बाजारात तेजी पाहायला मिळाली. एचडीएफसी सिक्युरिटीजनुसार रुपयाचे मुल्यात घट झाल्याने मंगळवारी राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये सोन्याच्या किंमतीत 240 रुपये प्रति 10 ग्रॅमची तेजी दिसून आली. या प्रमाणे दिल्लीत सोन्याचा दर 52,073 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचला होता. यापूर्वी गेल्या सत्रात सोन्याचा दर 51,833 रुपये प्रति 10 ग्रॅम होता.
एचडीएफसी सिक्युरिटीजनुसार राष्ट्रीय राजधानीत चांदीच्या किंमती पण 786 रुपयांच्या तेजीसह 64,927 रुपये प्रति किलोवर पोहचल्या होत्या. यापूर्वी गेल्या सत्रात चांदीची किंमत 64,141 रुपये प्रति किलोग्रामवर सुरू होती.
सिक्युरिटीचे सीनिअर अनालिसिस्ट (कमोडिटीज) तपन पटेल यांनी सांगितले की, दिल्लीत सोमवारी २४ कॅरेट सोन्याचा हाजीर भाव हा भारतीय रुपयांत घट झाल्यामुळे 240 रुपयांनी वाढला.
मुद्रा बाजाराबाबत बोलायचे तर भारतीय रुपयांच्या गेल्या तीन सत्रापासून वाढलेमुल्य आज थांबले. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया १२ पैशांनी खाली आला. त्यामुळे हा दर 73.28 च्या स्तरावर होता.
वैश्विक बाजारात सोने-चांदीची कीमत
आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या किंमतीत घट दिसून आली. 1,925 डॉलर प्रति औंस किंमत होती. तर चांदीची किंमत 25.26 डॉलर प्रति औंसवर होती.
वजन वाढू द्यायचं नाही ना ? मग रात्रीच्या जेवणात हे बदल आवर्जून करा
महाराष्ट्रात सोने-चांदी महागले
सोन्याच्या दरात आज वाढ दिसून आली. आज सोनं प्रति ग्राम 10 ग्रॅम 270 रुपयांनी महागले . प्रति 10 ग्रॅमसाठी 24 कॅरेट सोन्याचा आजचा दर 50,820 रुपयांवर सुरू आहे. तर प्रति 10 ग्रॅमसाठी 22 कॅरेट सोन्याचा आजचा दर 49,820 रुपयांवर सुरू आहे. गेल्या सत्रात 24 कॅरेट सोन्याचा दर 50,550 रुपयांवर बंद झाला आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर 49,550 रुपयांवर बंद झाला होता.
सोन्याच्या दरात वाढ झाली तशी चांदीच्या दरात सुरूवातीला वाढ दिसून आली. चांदीत 890 रुपये प्रति किलोची वाढ झाली. काल 62,910 वर असलेली चांदी आज 63,800 रुपयांवर विक्री सुरू आहे.
साडी फेडणं लय सोप्प असतंय…वाचा सविस्तर-
पाहू या महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील २४ कॅरेट सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)
शहरआजचा दरकालचा दर मुंबई ५० हजार ८२० -५० हजार ५५०, पुणे ५० हजार ८२०- ५० हजार ५५० ,जळगाव ५० हजार ८२०-५० हजार ५५०, कोल्हापूर ५० हजार ८२०-५० हजार ५५०,लातूर ५० हजार ८२०-५० हजार ५५०,सांगली ५० हजार ८२०- ५० हजार ५५०, बारामती ५० हजार ८२०- ५० हजार ५५०
तब्बल दोन तासांनी मुंबई पुन्हा पूर्व पदावर, लोकल सेवा सुरु
पाहू या महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील २२ कॅरेट सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)
शहर आजचा दर कालचा दर मुंबई ४९ हजार ८२०- ४९ हजार ५५०, पुणे ४९ हजार ८२०- ४९ हजार ५५०, जळगाव ४९ हजार ८२०- ४९ हजार ५५०, कोल्हापूर ४९ हजार ८२०- ४९ हजार ५५०, लातूर ४९ हजार ८२०-४९ हजार ५५० सांगली४९ हजार ८२०- ४९ हजार ५५०, बारामती ४९ हजार ८२०- ४९ हजार ५५०
‘मोकळं आभाळ’ पती-पत्नी मधील संवाद कसा असावा..!
पाहू या महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील चांदीचा दर (प्रति किलोग्रॅम)
शहर आजचा दर कालचा दर मुंबई ६३ हजार ८००-६१ हजार ९१०, पुणे ६३ हजार ८००- ६१ हजार ९१०,जळगाव ६३ हजार ८००- ६१ हजार ९१०, कोल्हापूर ६३ हजार ८००- ६१ हजार ९१०, लातूर ६३ हजार ८००- ६१ हजार ९१०, सांगली ६३ हजार ८००–६१ हजार ९१०, बारामती ६३ हजार ८००-६१ हजार ९१०
बाईलाही सेक्सची गरज असते की सेक्ससाठी बाईची गरज असते’ आवर्जून वाचा एका स्त्रीची कहाणी
साभार टाइम्स नाऊ मराठी