सोन्याचा भाव वाढला ; चांदीही 700 रुपयांनी महागली, पाहा आजचे भाव
नवी दिल्ली :आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी सोन्या (Gold price)-चांदीच्या दरात (Silver price)वाढ झाली आहे. जागतिक बाजारातून मिळालेल्या संकेतांमुळे एप्रिलच्या वायदेच्या सोन्याच्या किमतीने आठवडाभरातील उच्चांक गाठला. त्याचवेळी मार्च फ्युचर्स चांदीच्या किमतीत मोठी उसळी आली आहे.
सोमवारी, मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, 10 ग्रॅम सोन्याच्या किंमतीत 0.25 टक्क्यांनी वाढ नोंदवली गेली. तर चांदीची किंमत प्रति किलो 1.20 टक्क्यांनी वाढली. जागतिक बाजारात सोन्याच्या किमतीतही वाढ झाली आहे, मात्र मजबूत अमेरिकन डॉलरमुळे वाढीला ब्रेक लागला आहे. इतर प्रमुख चलनांच्या तुलनेत डॉलर निर्देशांक 95.580 च्या पातळीवर होता. (Surge in Gold price, Silver rises by Rs 700, check latest rates)
सोन्याला महागाई आणि भू-राजकीय तणावाविरूद्ध हेज म्हणजे सुरक्षित गुंतवणूक मानले जाते. तथापि, दर वाढल्याने नॉन-इल्डिंग सोने ठेवण्याचा खर्च वाढेल. व्यापारी या आठवड्याच्या यूएस चलनवाढीच्या डेटावरून संकेत घेतील. यामध्ये आणखी चढ-उतार होण्याची शक्यता आहे.
सोने आणि चांदीचा भाव
सोमवारी, MCX वर एप्रिल फ्युचर्स सोन्याचा भाव 120 रुपये किंवा 0.25 टक्क्यांनी वाढून 48,044 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव 0.2 टक्क्यांनी वाढून 1,810.38 डॉलर प्रति औंस झाला. त्याच वेळी, मार्च फ्युचर्स चांदीची किंमत 730 रुपये किंवा 1.20 टक्क्यांनी वाढून 61,579 रुपये प्रति किलोवर पोहोचली. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीची किंमत ०.९ टक्क्यांनी वाढून २२.६७ डॉलर प्रति औंस झाली.
गोल्ड ईटीएफकडे गुंतवणूकदारांचा कल
महागाई वाढल्यामुळे आणि बाजारातील मुल्यांकनात झालेली वाढ यामुळे गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड (गोल्ड ईटीएफ) गुंतवणूकदारांच्या आकर्षणाचे केंद्र बनले आहेत. गेल्या वर्षी म्हणजे 2021 मध्ये, गोल्ड ETF मध्ये 4,814 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. जागतिक पुनरुज्जीवन आणि सुधारित गुंतवणूकदारांच्या भावनांमुळे 2021 मध्ये महामारीच्या वर्षाच्या तुलनेत सोन्याच्या ETF मधील गुंतवणुकीत घट झाली आहे.
गोल्ड ईटीएफ वर्षभर गुंतवणूकदारांना आकर्षित करत आहेत. समभागात तेजी असतानाही त्याचे आकर्षण कायम राहिले. गेल्या वर्षी केवळ जुलै महिन्यात गोल्ड ईटीएफमधून पैसे काढले गेले होते. जुलैमध्ये गुंतवणूकदारांनी गोल्ड ईटीएफमधून ६१.५ कोटी रुपये काढले. गुंतवणुकीतील उडीमुळे, गोल्ड फंडाची AUM (अॅसेट अंडर मॅनेजमेंट) डिसेंबर 2021 पर्यंत 30 टक्क्यांनी वाढून 18405 कोटी रुपये झाली. डिसेंबर 2020 मध्ये हा आकडा 14174 कोटी रुपये होता.
2021 मध्ये, गोल्ड ETF साठी पोर्टफोलिओची संख्या जवळपास चार पटीने वाढली आहे. गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंडासाठी फोलिओची संख्या डिसेंबर 2020 मध्ये 8.87 लाखांच्या तुलनेत डिसेंबर 2021 मध्ये 32.09 लाख होती. गोल्ड ETF मध्ये ऑगस्ट 2019 पासून तेजी दिसून येत आहे. नोव्हेंबर 2020 मध्ये 141 कोटी, फेब्रुवारी 2020 मध्ये 195 कोटी आणि जुलै 2021 मध्ये 61.5 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली आहे.
साभार टाइम्स नाऊ