नवी दिल्ली : मंगळवारी सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किंमतीत जबरदस्त वाढ पाहायला मिळाली. एचडीएफसी सिक्युरिटीजच्या नुसार राष्ट्रीय राजधानी दिल्ली मंगळवारी सोन्याचा भाव 514 रुपये प्रति 10 ग्रॅम वाढ दिसून आली आहे. या घटीमुळे सोन्याचा भाव 48,847 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. गेल्या सत्रात सोने 48,333 रुपये प्रति 10 ग्रॅमवर भाव बंद झाला आहे. सिक्युरिटीनुसार मजबूत वैश्विक कल आणि भारतीय रुपयात आलेली कमजोरी यामुळे सोनेच्या भावात वाढ पाहायला मिळाली.
चांदीच्या भावात बुधवारी जबरदस्त वाढ पाहायला मिळाली. चांदीमध्ये 1,046 रुपयांची वाढ झाली. या घटीमुळे चांदीची किंमत 63,612 रुपये प्रति किलोग्रॅम झाली आहे. गेल्या सत्रात चांदी 62,566 रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाली होती.
एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल यांनी सांगितले की, दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा हाजीर भाव मंगळवारी मजबूत जागतिक कल आणि रुपयातील घटीमुळ 515 रूपयांनी वाढला. दुसरीकडे भारतीय रुपया मंगळवारी अमेरिकन डॉलरच्या तुलनेत ८ पैसे कमकुवत होऊन 73.63 वर बंद झाला.
आंतरराष्ट्रीय स्तराबाबत बोलायचे झाले तर सोन्याचा वैश्विक भाव गुरूवारी वाढीसह 1845 डॉलर प्रति औंसवर ट्रेंड करताना दिसत होता. चांदीची वैश्विक किंमत गुरूवारी 23.16 डॉलर प्रति औंसवर स्थिर ट्रेंड करत होती.
मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्विसेजचे वीपी (कमोडिटीज रिसर्च) नवनीत दमानी यांनी सांगितले की डॉलर आपल्या प्रतिस्पर्धी चलनांच्या तुलनेत कमकुवत झाल्याने आणि अमेरिकेत मदत पॅकेजच्या घोषणेत अनिश्चितता असल्याने सोन्याची किंमतीत वाढ दिसून आली.
महाराष्ट्रात सोने महाग, चांदीत किरकोळ वाढ
सोन्याच्या दरात वाढ दिसून आली. सोनं प्रति 10 ग्रॅम 50 रुपयांनी वाढ झाली. प्रति 10 ग्रॅमसाठी 24 कॅरेट सोन्याचा दर 49,200 रुपयांवर सुरू आहे. तर प्रति 10 ग्रॅमसाठी 22 कॅरेट सोन्याचा दर 48,200 रुपयांवर सुरू आहे. गेल्या सत्रात 24 कॅरेट सोन्याचा दर 49,150 रुपयांवर बंद झाला होता. 22 कॅरेट सोन्याचा दर 48,150 रुपयांवर बंद झाला होता.