नवी दिल्ली : स्थानिक बाजारात सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किंमतीत चांगली वाढ पाहायला मिळाली. एचडीएफसी सिक्युरिटीजच्या नुसार राष्ट्रीय राजधानी दिल्ली सोमवारी सोन्याचा भाव 877 रुपये प्रति 10 ग्रॅम वाढ दिसून आली आहे. या वाढीमुळे सोन्याचा भाव 50,619 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. गेल्या सत्रात सोने 49,742 रुपये प्रति 10 ग्रॅमवर भाव बंद झाला होता.
चांदीच्या भावात सोमवारी जबरदस्त वाढ पाहायला मिळाली. चांदीमध्ये 2,012 रुपयांची वाढ झाली. या घटीमुळे चांदीची किंमत 69,454 रुपये प्रति किलोग्रॅम झाली आहे. गेल्या सत्रात चांदी 67,442 रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाली होती.
सिक्युरिटीनुसार जागतिक स्तरावर सोन्याचे मूल्य वाढीमुळे भारतीय बाजारात मौल्यवान धातूची किंमतीत वाढ झाली.
महाराष्ट्रात सोने महाग, चांदीत जबरदस्त वाढ
सोन्याच्या दरात वाढ दिसून आली. सोनं प्रति 10 ग्रॅम 160 रुपयांनी वाढ झाली. प्रति 10 ग्रॅमसाठी 24 कॅरेट सोन्याचा दर 50,220 रुपयांवर सुरू आहे. तर प्रति 10 ग्रॅमसाठी 22 कॅरेट सोन्याचा दर 49,220 रुपयांवर सुरू आहे. गेल्या सत्रात 24 कॅरेट सोन्याचा दर 50,060 रुपयांवर बंद झाला होता. 22 कॅरेट सोन्याचा दर 49,060 रुपयांवर बंद झाला होता.
सोन्याच्या दरात वाढ झाली तसेच महाराष्ट्रात चांदीच्या दरात 2180 रुपयांची घट झाली आहे. काल 68,120 वर असलेली चांदी आजही 70,300 रुपयांवर विकली जात आहे.