मुंबईः केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प (बजेट) जाहीर केला. अर्थसंकल्पातील घोषणेनुसार सोने आणि चांदी या दोन्ही मौल्यवान धातूंवरील कस्टम ड्युटीत कपात करण्याचा निर्णय झाला आहे. ही तरतूद मंजूर झाल्यास सोने आणि चांदी हे दोन्ही मौल्यवान धातू स्वस्त होणार आहेत. (Gold Silver price today on 1st February 2021 Maharashtra Mumbai Pune latest rates and updates)
सोने, चांदी स्वस्त होणार; जाणून घ्या आजचे सोने-चांदी दर
सध्या आयात केल्या जाणाऱ्या मौल्यवान धातूंवर जीएसटी आणि इतर कर लागू होतात. या करांमुळे मौल्यवान धातूंची किंमत आणखी वाढते. भारतात सोने आणि चांदी या दोन्ही मौल्यवान धातूंचा उपयोग अलंकार (आभूषणे) तयार करण्यासाठी, गुंतवणूक करण्यासाठी, अध्यात्मिक कारणांसाठी, धार्मिक कारणांसाठी आणि वैद्यकीय कारणांसाठी होतो. भारतीय संस्कृतीत सोने आणि चांदी या दोन्ही मौल्यवान धातूंना महत्त्व आहे. भारतात सोने आणि चांदी हे मौल्यवान धातू प्रतिष्ठेचे प्रतिक समजले जातात. याच कारणामुळे भारतात सोने आणि चांदी या दोन्ही मौल्यवान धातूंना मोठी मागणी आहे. शुभकार्याच्या निमित्ताने भारतात सोने आणि चांदी या दोन्ही मौल्यवान धातूंची खरेदी केली जाते. याच कारणामुळे भारतीय नागरिकांच्या दृष्टीने सोने आणि चांदी या दोन्ही मौल्यवान धातूंच्या किंमती आणि दरातील चढउतार हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
गुंतवणुकीपेक्षा भारतीयांचा कल अन्य कारणांसाठी सोने आणि चांदी यांच्या खरेदीकडे जास्त आहे. भारतीय मानसिकतेची जाणीव असलेल्या केंद्र सरकारने सोने आणि चांदी या दोन्ही मौल्यवान धातूंवरील कस्टम ड्युटीत कपात करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयामुळे सोने आणि चांदी या दोन्ही मौल्यवान धातूंच्या किंमती कमी होण्याची शक्यता वाढली आहे.
अर्थसंकल्प १ एप्रिल २०२१ पासून अंमलात येणार आहे. याआधी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये अर्थसंकल्प मंजूर होईल. पण अर्थसंकल्पात झालेल्या घोषणेमुळे भारताच्या सराफा बाजारात आनंदाचे वातावरण आहे. किंमती कमी झाल्यास सोने आणि चांदी यांच्या खरेदीत वाढ होईल, असे मत सराफा बाजारातून व्यक्त होत आहे.
आज (१ फेब्रुवारी २०२१, सोमवार) मुंबईच्या बाजारात दहा ग्रॅम (एक तोळा) सोन्याचा दर ४८ हजार २४५ रुपयांवर जाऊन पोहोचला. अमेरिकन डॉलरमध्ये घसरण झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दर घसरण झाली. प्रति औंस सोने १८५८.४५ डॉलर या दरावर पोहोचले. चांदी २९.२९ डॉलर प्रति औंस वर पोहोचली.
मुंबईतील सोने आणि चांदी या मौल्यवान धातूंचे दर
सोमवार, १ फेब्रुवारी २०२१
२२ कॅरेट १० ग्रॅम सोने (एक तोळा) – ४७ हजार ३०० रुपये
२४ कॅरेट १० ग्रॅम सोने (एक तोळा) – ४८ हजार २४५ रुपये
चांदी (प्रतिकिलो) – ६९ हजार ५०० रुपये