सोने चांदीच्या भावात चढउतार सुरूच ;जाणून घ्या आजचा भाव
नवी दिल्ली : जागतिक स्तरावर कमी मागणी आणि व्यवहारात भाग घेणाऱ्यांनी व्यवहारांची संख्या कमी केल्याने सोने आणि चांदीचे भाव कमी होण्याचे सत्र कायम सुरू आहे. हाजिर बाजारासोबत वायदा बाजारातही या दोन धातूंच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात घट पाहायला मिळते आहे.

स्थानिक बाजारात आठवड्याच्या पाचव्या दिवशी शुक्रवारी सोन्याच्या वायदा भावात (Gold Futures Price) घट झाली. एमसीएक्स (MCX)वर सकाळी ११ वाजून २४ मिनिटांनी पाच ऑक्टोबर २०२० च्या सोन्याचा वायदा भावात ०.७२ टक्के म्हणजे ३८० रुपयांची घट होऊन प्रती १० ग्रॅम ५२ हजार ५५० रुपयांवर ट्रेंड करत होता.
गेल्या सत्रात MCXवर ऑक्टोबरच्या डिलेव्हरीच्या सोन्याचा वायदा भाव ५२ हजार ९३० रुपये प्रति १० ग्रॅम सुरू होता. गुरूवारी वायदा बाजार बंद झाला. तेव्हा ऑक्टोबरच्या डिलेव्हरीच्या सोन्याची किंमत ५३ हजार १२५ रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाली.
दुसरीकडे, चांदीबाबत बोलायचे झाले तर स्थानिक बाजारात शुक्रवारी त्यांच्या किंमतीत घट दिसून आली. एमसीएक्सवर चार सप्टेंबर २०२० च्या चांदीचा भाव शुक्रवारी सकाळी ११ वाजून २५ मिनिटांनी १२४० रुपयांच्या घटीसह ६९ हजार ८३७ रुपये प्रति किलो ग्रॅमवर ट्रेंड करत होती. गुरूवारी वायदा बाजारात चांदीचा भाव ७१ हजार ०७७ रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद राहिला.
शुक्रवारी चांदी घटीसह ७० हजार ६५० रुपये प्रति किलोग्रॅमवर खुली झाली. त्यानंतर काही काळाने यात आखणी घट दिसून आली. या शिवाय चार डिसेंबर २०२० च्या चांदीचा वायदा भाव या वेळी १२८४ रुपयांच्या घटीसह ७२ हजार ३१४ रुपये प्रति किलो ग्रॅमवर ट्रेंड करत आहे. यापूर्वी गुरूवारी चांदीची वायदा किंमत प्रति किलो ७३ हजार ५९८ रुपयांच्या स्तरावर होती.
मुंबईत सोने आणि चांदीच्या दरात झाली घट
सोन्याच्या दरात आज सुरूवातीच्या कारभारात घट दिसून आली. आज सोनं प्रति ग्राम १० ग्रॅम ५० रुपयांनी स्वस्त झाले . प्रति १० ग्रॅमसाठी २४ कॅरेट सोन्याचा आजचा दर ५२ हजारवर २०० सुरू आहे. तर प्रति १० ग्रॅमसाठी २२ कॅरेट सोन्याचा आजचा दर ५१ हजारवर २०० सुरू आहे. सोन्याच्या दरासोबत चांदीच्या दरात सुरूवातीला किरकोळ घट दिसून आली. चांदीत ५० रुपयांची घट झाली. काल ६७ हजार ००० वर असलेली चांदी आज ६७ हजार ९५० रुपयांवर विक्री सुरू आहे.
गेल्या सत्रात २४ कॅरेट सोन्याचा दर ५२ हजारवर २५० वर बंद झाला आहे. २२ कॅरेट सोन्याचा दर ५१ हजारवर २५० वर बंद झाला होता.