मुलीच्या लग्नाचा खर्च टाळून ‘त्यांनी’ दिली रुग्णवाहिका भेट

 

पुणे | पुरंदर येथील रहिवासी असलेल्या, सामाजिक कार्यकर्ते, शिवसेनेचे नेते असलेल्या प्रकाश ताटे यांच्या मुलीचा विवाह रविवार रोजी संपन्न झाला. या विवाहाच्या वेळी प्रकाश ताटे यांनी अवांतर खर्च टाळून, राहिलेल्या पैशातून पुरंदर तालुक्यातील, जनतेच्या सेवेसाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून देत, जनतेसमोर एक सामाजिक आदर्श ठेवला आहे. ताटे यांच्या या सामाजिक कार्याची तालुक्यात सगळीकडेच कौतुक होत आहे.

राख येथील प्रकाश ताटे यांची कन्या योगिता प्रकाश ताटे व सातारा जिल्ह्यातील सिद्धेश्वर कुरोली येथील श्रीजित संभाजीराव देशमुख यांचा विवाह रविवारी संपन्न झाला. या विवाहामध्ये अवांतर होणारा खर्च या दोन्ही कुटुंबांकडून टाळण्यात आला. त्यामुळे या विवाहामध्ये वधू-पित्याचे जे पैसे बचत झाले होते.

तसेच या पैशातून त्यांनी पुरंदर तालुक्यातील जनतेच्या सेवेसाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली. माजी राज्यमंत्री व पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतरे यांच्या हस्ते, विवाहस्थळी या रूग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. दरम्यान, शिवसेना नेते, प्रकाश ताटे यांनी राबवलेल्या या उपक्रमाचे माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी कौतुक केलं.

Team Global News Marathi: