मुलगी मोबाइलवर गेम खेळत होती अन् घरात त्याने भिंतीवर डोक आपटून आईला संपवलं

 

उल्हासनगर | उल्हासनगरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. किरकोळ वादातून एका महिलेची भिंतीवर डोक आपटून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. यात मुली समोरच आरोपींनी तिच्या आईची हत्या केली. हत्या करून आरोपी फरार झाला आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुकन्या आव्हाड असं हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे.

सुकन्या यांच्या पतीचे 7 वर्षांपूर्वीच निधन झाले होते. सध्या सुकन्या आपल्या तीन मुलांसोबत कॅम्प चारच्या चिंचपाडा परिसरात राहत होत्या. काही दिवसांपासून सुकन्या यांचं अनिल भातसोडे या व्यक्तीसोबत परिचय वाढला. दोघे लग्न करणार असल्याने सुकन्या यांच्या घरी अनिलचं येणं जाणं वाढलं होतं. अनिल हा अनेकदा सुकन्याकडे पैशांची मागणी करत असल्याने दोघांमध्ये वाद होत होते. 12 तारखेला अनिल आणि सुकन्या यांच्यात किरकोळ वाद झाले. यावेळी अनिलने सुकन्याला बेदम मारहाण करत तिचे डोक भिंतीवर आपटलं. हा सगळा प्रकार सुकन्या याच्या मुलीने पाहिला.

ती घराबाहेर मोबाईलमध्ये व्हिडीओ गेम खेळत असताना, तिला घरातून आईच्या ओरडण्याचा आवाज आला तेव्हा घरात डोकावून पाहिले असता अनिल हा तिच्या आईचे डोके भिंतीवर आपटत असताना तिने पाहिले. यात सुकन्या गंभीर जखमी झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र तिचा मृत्यू झाला. हत्या करून त्या अनिल हा फरार झाला.आता सुकन्या यांची मुलगी आकांक्षा हिच्या तक्रारीवरून विठ्ठलवाडी पोलिसांनी आरोपी अनिल भातसोडे याच्या विरोधात हत्याचा गुन्हा दाखल केला असून आरोपीच्या शोधासाठी पथक रवाना करण्यात आले आहे.

Team Global News Marathi: