गणपती बाप्पा मोरया, उद्धव ठाकरेंना सुबुद्धी द्या, भाजपचं शंखनाद आंदोलन

 

पुणे | भाजपतर्फे मंदिरे उघडण्यासाठी आज राज्यभर जोरदार आंदोलन सुरू असून त्याचे पडसाद पुण्यात देखील पाहायला मिळाले. भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पुण्याचे ग्रामदैवत असलेल्या कसबा गणपती परिसरात एकत्र येत शंखनाद आंदोलन केले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी देशासाठी, धर्मासाठी.. भाजप.. भाजप, बोल बजरंगबली की जय, गणपती बाप्पा मोरया… मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना बुद्धी द्या! मोरया मोरया.. गणपती बाप्पा मोरया! यासारख्या जोरदार घोषणाबाजी केली.

महाराष्ट्रभर भाजपचे मंदिर उघडण्यासाठी आंदोलन सुरू आहे. आज पुण्यातही आंदोलन झालं. या शंखनाद आंदोलनावेळी कसबा मंदिर उघडण्यात आलं. यावेळी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशध्यक्ष चंद्रकांत पाटील, महापौर मुरलीधर मोहोळ, शहराध्यक्ष जगदीश मुळीक,माजी महापौर मुक्ता टिळक, सरचिटणीस दीपक पोटे उपस्थित होते.

मात्र कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या बंदोबस्तालाही आव्हान देत मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. या आंदोलनात भाजप महिला कार्यकर्त्यांही मोठ्या संख्येने सहभाग झाल्या होत्या. यावेळी कडक पोलीस बंदोबस्त होता. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी केलेल्या गर्दीमुळे मंदिर प्रवेश करतानाही पोलिसांची तारांबळ उडाली. भाजप कार्यकर्त्यांनी धक्काबुक्कीचा प्रकार घडला. मंदिराच्या गाभाऱ्यात गेल्यानंतर चंद्रकांत पाटील, महापौर, मुळीक यांनी गणपतीची आरती केली.

Team Global News Marathi: