खेल आपने शुरु किया है, हम खत्म करेंगे…… भाजपा आमदार नितेश राणेंच्या नव्या ट्विटने चर्चांना उधाण

 

मुंबई | दिशा सालियनवर अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आल्याचं वक्तव्य भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी पत्रकार परिषदेत केलं होतं. त्यानंतर तिच्या पालकांनी नारायण राणे आणि नितेश राणेंविरोधात मालवणी पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या संदर्भात महिला आयोगाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर नारायण आणि नितेश राणेंविरोधात मुंबईच्या मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यानंतर आता त्यांची या वक्तव्याप्रकरणी चौकशी करण्यात येणार आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि नितेश राणे यांना आज चौकशीसाठी दुपारी १ वाजता हजर राहावं लागणार आहे. यापूर्वी नितेश राणेंनी एक ट्विट केलं आहे. ‘खेल आपने शुरु किया है, हम खत्म करेंगे, न्याय मिलेगा’ असं म्हणत दिशा सालियन प्रकरणी नितेश राणेंनी ट्वीट केलं आहे. सुरुवात तुम्ही केलीय, शेवट आम्ही करणार असं सांगत नितेश राणेंनी #JusticeForDishaSalian असा हॅशटॅग देत ट्वीट केलं आहे.

 

सुशांतसिंग राजपूत यांच्या पूर्व व्यवस्थापकाचं काम केलेल्या दिशा सालियानच्या मृत्यूबाबत सीबीआय यंत्रणेमार्फत तपास करण्यात आला आहे. मृत्यूपूर्वी तिच्यावर बलात्कार झाला नसून त्यावेळेस ती गरोदर देखील नव्हती, असं तिच्या शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आलं आहे. त्यास तिच्या आईवडिलांनी देखील दुजोरा दिला आहे, असे असतानाही केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिशा सालियान हिचा बलात्कार करून हत्या झाल्याचा आरोप केला आहे.

Team Global News Marathi: