‘गली गली मै शोर है, धैर्यशील माने चोर है’ संतप्त शिवसैनिक घोषणा देत धडकले मानेंच्या घरावर

 

कोल्हापूर | शिंदे गटाच्या बंडखोरीनंतर आमदारांपाठोपाठ खासदार सुद्धा शिंदे गटात सामील झाल्यामुळे शिवसैनिक कमालीचे संतापले आहे. आज कोल्हापूरमध्ये खासदार धैर्यशील माने यांच्या घरावर शिवसैनिकांनी मोर्चा काढला. धैर्यशील मानेंच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करत शिवसैनिकांनी परिसर दणाणून सोडला आहे.

कोल्हापूरचे दोन्ही खासदार शिंदे गटात सामील झाल्यामुळे शिवसेनेत मोठी खळबळ उडाली. त्यामुळे आज संतापलेल्या शिवसैनिकांनी धैर्यशील माने यांच्या घरावर मोर्चा काढला. यावेळी ‘गली गली मै शोर है, माने चोर है’ अशा घोषणा देण्यात आल्या. मार्केट यार्ड परिसरातून या मोर्चाला सुरुवात झाली. खासदार धैर्यशील माने यांना शिवसेनेनं पाठबळ देऊन निवडून आणलं. मात्र, तरीही त्यांनी शिवसेना सोडल्यानं त्यांच्या मतदारसंघातील शिवसैनिकआक्रमक झाले आहेत.

तर, खासदार धैर्यशील माने यांनी कोल्हापूर हातकणंगले लोकसभा मतदार संघातून शिवसेनेच्या चिन्हावर लढवली पण त्यांनी माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याशी गद्दारी करून घाणीत उडी मारली. त्यांच्या हिम्मत असेल तर त्यांनी राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवावी आणि निवडूण यावे, असं शिवसेना जिल्हाध्यक्ष मुरलीधर जाधव यांनी थेट आव्हान माने यांना दिले आहे.

धैर्यशील माने हे खरे वारसदार असतील तर त्यांनी शिवसेनेत गद्दारी करून बाहेर पडले तसे त्यांनी राजीनामा देऊन निवडणूक लढवावी. खासदार गटाने दोन वेळा गद्दारी केली यांची लायकी नसताना त्यांना उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी दिली पण त्यांनी आपली औकाद दाखवली, अशी टीकाही जाधव यांनी केली.

आरे कॉलनीतील मार्गावरील वाहतूक 24 तासांसाठी बंद

फक्त साऊथ अभिनेता नाही, भारतीय अभिनेता म्हणा’; धनुषने व्यक्त केली नाराजी

Team Global News Marathi: