गडकरींचा केंद्र सरकारला सल्ला म्हणाले; एका ऐवजी 10 कंपन्यांना व्हॅक्सीन बनवण्याची परवानगी द्यावी

लसीच्या तुटवड्याविषयी केंद्रीय रस्तेविकास आणि परिवहन मंत्री नितीन गडकरींनी आपल्याच सरकारला सल्ला दिला आहे. त्यांनी म्हटले की, सरकारने एका ऐवजी 10 कंपन्यांना व्हॅक्सीन बनवण्याची परवानगी द्यावी. गडकरी मंगळवारी विद्यापीठांच्या कुलगुरूंसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करत होते. यावेळी त्यांनी ही सूचना केली.

गडकरी म्हणाले – पुरवठ्यापेक्षा जास्त लस देण्याची मागणी होत असेल अडचण येणारच आहे. एका कंपनीऐवजी लस उत्पादनासाठी सरकारने 10 कंपन्यांना मान्यता द्यावी. त्यांना देशात पुरवठा करु द्यावा आणि मग जेव्हा आपल्याकडे अतिरिक्त लस येतील, मग या कंपन्या परदेशात निर्यात करतील. हे काम 10-15 दिवसांत केले पाहिजे.

गडकरी यांनी सल्ल्यानंतर स्पष्टीकरण दिले
गडकरी म्हणाले की, जेव्हा मी काल या गोष्टी बोलत होतो तेव्हा मला माहिती नव्हते की रसायन व खत मंत्री मनसुख मंडाविया यांनी लस उत्पादन वाढवण्यासाठी सरकारच्या प्रयत्नांची माहिती यापूर्वी दिली होती. तसेच त्यांनी मला सांगितले की सरकार 12 वेगवेगळ्या प्लांट आणि कंपन्यांमध्ये लस तयार करत आहे. मी त्यांचे अभिनंदन केले आणि म्हटले की तुमची टीम योग्य दिशेने कार्य करत आहे.

वैद्यकीय ऑक्सिजनच्या बाबतीत आत्मनिर्भरता आवश्यक: गडकरी

गडकरी म्हणाले की, अजूनही भारताला औषधांसाठीचा कच्चा माल परदेशांकडून मागवावा लागतो. आम्हाला स्वावलंबी भारत बनवायचा आहे. वैद्यकीय ऑक्सिजनच्या बाबतीत भारतातील सर्व जिल्हे स्वयंपूर्ण असावीत. ते म्हणाले की, देशातील आरोग्य क्षेत्र सध्या एका मोठ्या संकटातून जात आहे. महामारी काळात सकारात्मक राहताना आपल्याला मनोबल मजबूत ठेवले पाहिजे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: